घरमनोरंजनआजही चाहत्यांचे रजनीकांतवरचे प्रेम तसूभरही कमी नाही

आजही चाहत्यांचे रजनीकांतवरचे प्रेम तसूभरही कमी नाही

Subscribe

रजनीकांतची लोकप्रियता त्यांच्या चाहत्यांमध्ये एवढी आहे की, त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने ‘थलायवा’ असं म्हणतात. नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टच्या अनुसार, गेल्या सहा महिन्यांमध्ये रजनीकांतची लोकप्रिता पाहता, तेच ‘थलायवा’ असल्याचीच गोष्ट पून्हा एकदा अधोरेखीत झालीय.

रजनीकांतच्या २०१८-१९ मध्ये तीन फिल्म्स रिलीज झाल्या. काला, 2.0 आणि पेटा ह्या तीन चित्रपटांमूळे वेबसाइट, ई पेपर आणि वायरल न्यूजमध्ये ५४४७ अंकांसह रजनीकांत बाकी दक्षिणात्य अभिनेत्यांहून अग्रेसर असल्याचेच समोर आले आहे. आणि गेल्या सहा महिन्यांमधल्या रँकिंगनूसार, तर 100 पैकी 100 गुणांसह रजनीकांत लोकप्रियतेत अग्रणी असल्याचेच समोर आले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

- Advertisement -

मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन ह्या लोकप्रियतेच्या चार्टमध्ये दूस-या स्थानी आहे. तर बाहुबली फेम प्रभास लोकप्रियतेत तिस-या क्रमांकावर आहे. बाहुबलीनंतर प्रभासची लोकप्रियता दक्षिणमध्येच नाही तर बॉलीवूडमध्येही वाढलीय. आपल्या महर्षी चित्रपटामूळे महेशबाबू चौथ्या स्थानी आहे. तर २०१८ मध्ये रिलीज झालेली महेश बाबूची ‘भारत अने नेनू’ टॉप ग्रॉसर फिल्म असल्यामूळेही त्याच्या लोकप्रियतेत वाढ झालेली आहे. महर्षीमूळे तर जगभरात महेशबाबूच्या फॅनफॉलोविंग चांगलीच वाढ झालीय.

सुपरस्टार मोहनलालच्या ‘लुसिफर’ आणि ‘ओडियन’ ह्या दोन फिल्म्सनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. म्हणूनच स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर 3294 गुणांसह मोहनलाल पांचव्या स्थानी आहेत. मोहनलाल यांच्या चाहतावर्गामूळे लोकप्रियतेत पाचव्या पदावर आहेत.

“आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”
– अश्विनी कौर,स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -