घरमनोरंजन'प्रॉन्स'ला मिळाले ११ पुरस्कार

‘प्रॉन्स’ला मिळाले ११ पुरस्कार

Subscribe

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात हल्ली अनेक सिनेमा आणि मालिकांचे शुटींग चालते. मराठीतील मालिका 'रात्रीस खेळ चाले', 'गाव गाता गजाली' या मालिकांमधून कोकणी, मालवणी भाषेसोबत कोकणाचे सौंदर्य दाखवले.

प्रॉन्स म्हटले की, मासळी खाणाऱ्यांना लगेचच कोळंबी आठवते. पण आता प्रॉन्सला ११ पुरस्कार कसले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच! पण ‘प्रॉन्स’ हा मराठीतला लघुपट असून या लघुपटाने तब्बल ११ पुरस्कार मिळवले आहेत. नुकतेच या लघुपटाला प्रभात चित्र मंडळाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. वडील आणि मुलामधील नात्यातील चढ- उतार या लघुपटातून दाखवण्यात आले आहेत.

sushas sirsat and sarthak_watve
अभिनेता सुहास शिरसाट आणि सार्थक वटवे

शिक्षणापासून वंचित मुलाची कहाणी

आजही अनेक गावांमध्ये प्राथमिक शिक्षणापासून अनेक मुले वंचित आहेत. घर आणि जबाबदारी सांभाळत असताना शिक्षणापेक्षा कामाला आणि पैसे कमवण्याला महत्त्व दिले जाते. या लघुपटातही मुलगा आणि वडीलांमध्ये शिक्षणांसदर्भातील मतभेद दाखवण्यात आले आहे. यात शेवटी काय होतं हे सांगणारा हा लघुपट आहे. या लघुपटात रात्रीस खेळ चाले मालिकेतील दत्ता म्हणजेच सुहास शिरसाट, गाव गाता गजाली मालिकेतील सार्थक वटवे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर स्वप्निल शेटये यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.

- Advertisement -
प्रॉन्झमध्ये अभिनेता सुहास शिरसाट
प्रॉन्झमध्ये अभिनेता सुहास शिरसाट

११ पुरस्कारांनी सन्मानित

प्रॉन्सला ११ वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. औरंगाबाद राष्ट्रीय लघुपट महोत्सव, प्रभात चित्र मंडळ, महर्षी चित्रपट संस्था नाशिकचा उत्कृष्ट बाल कलाकार आणि संगीत पुरस्कार, स्काय लाईट पुणेचा लघुपट आणि सिनेमॅटोग्राफी पुरस्कार मिळाला आहे. ऐक्य राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे ४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कोकणात झालं शुटींग

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात हल्ली अनेक सिनेमा आणि मालिकांचे शुटींग चालते. मराठीतील मालिका ‘रात्रीस खेळ चाले’, ‘गाव गाता गजाली’ या मालिकांमधून कोकणी, मालवणी भाषेसोबत कोकणाचे सौंदर्य दाखवले. प्रॉन्स या लघुपटाचे शुटींगही कोकणात झाले आहे.

- Advertisement -
shooting_prawns
कोकणात झाले लघुपटाचे शुटींग

मराठी लघुपटांची चर्चा

गेल्या काही वर्षांपासून मराठी लघुपटांची चर्चा आहे. अनेक लघुपट महोत्सवात मराठी लघुपट अनेक चांगले विषय घेऊन येत आहेत. शिवाय या लघुपटांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक  लघुपट महोत्सव देशभरात आयोजित केले जातात.त्यामुळे या महोत्सवांकडे तरुणांचा कल वाढत आहे.

(सौजन्य- यु ट्यूब)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -