घरमनोरंजनराधिका आपटे करणार 'अवयवदान'

राधिका आपटे करणार ‘अवयवदान’

Subscribe

बॉलीवूड स्टार्स आणि त्यांचं ‘सोशल वर्क’ हे समीकरण काही नवीन नाही. बॉलीवूडचे असे हिरो-हिरॉईन्स आहेत जे वेळातवेळ काढून समाजसेवा करत असतात. समाजसेवा मग ती कुठल्याही प्रकारची असो स्टार्स आपल्यापरीने ती करत असतात. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान तसंच सुष्मिता सेन, रविना टंडन हे स्टार्स समाजसेवेमध्ये नेहमीच पुढाकार घेतात. यापाठोपाठ आत बॉलीवूडच्या आणखी एका अभिनेत्रीने समाजसेवेमध्ये पुढाकार घेतला आहे. ही अभिनेत्री आहे मराठमोळी राधिका आपटे. मराठी सिनेमा आणि बॉलीवूडपटांपासून ते सध्या गाजत असलेल्या ‘सॅक्रेड गेम्स’ या वेबसिरीजपर्यंत राधिकाने नेहमीच आपल्या दर्जेदार अभिनयाची छाप पाडली आहे. नेहमची आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी ओळखली जाणारी राधिका आपटे आता सोशल वर्कसाठी पुढे सरसावली आहे. राधिका आपटे ‘ऑर्गन डोनेशन’ अर्थात अवयवदान करणार असल्याचं तिने सांगितलंय. राधिकाने आपल्या ऑफिशिअल ट्वीटर अकाउंटवरुन एका व्हिडिओद्वारे याबाबत घोषणा केली आहे.

लोकांनाही केले आवाहन

अवयवदानासाठी नाव नोंदणी केल्यानंतर राधिकाला देण्यात आलेल्या, ‘ऑर्गन डोनर कार्ड’ चा फोटोही तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो’ या भावनेतून मी हा अवयवदानाचा निर्णय घेतला असल्याचं राधिका सांगते. दरम्यान राधिका आपटेने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांनाही अवयवदान करण्याचं आवाहन केलं आहे. ‘देशातील जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करुन गरजू लोकांचं भलं करावं’, अशाप्रकारचा एक संदेश राधिकाने तिच्या व्हिडीओमधून दि्ला आहे. सॅक्रेड गेम्स या लोकप्रिय वेब सिरीजमधून सध्या लाईल लाईटमध्ये असलेली राधिका अवयवदानाच्या या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -