घरदेश-विदेशआरूषी मर्डर केस; तलवार दाम्पत्या समोरच्या अडचणी वाढल्या?

आरूषी मर्डर केस; तलवार दाम्पत्या समोरच्या अडचणी वाढल्या?

Subscribe

आरूषी तलवार मर्डर प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आता सीबीआयची याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे आरूषी मर्डर केसच्या सुनावणीसाठी दाम्पत्याला पुन्हा एकदा कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.

२००८ साली झालेल्या आरूषी तलवार हत्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला. आरूषीच्या हत्या प्रकरणामध्ये तलवार दाम्पत्यावरच संशयाची सुई कायम होती. अखेर २६ नोव्हेंबर २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने तलवार दाम्पत्याला जन्मठेपेचे शिक्षा ठोठावली. शिक्षेविरोधात तलवार दाम्पत्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. तलवार दाम्पत्याच्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. त्यानंतर तलवार दाम्पत्याची पुराव्याअभावी ४ वर्षानंतर निर्दोष सुटका करण्यात आली होती. पण याच सुटकेविरोधात आता CBIने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून न्यायालयाने देखील सीबीआयची याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. तलवार दाम्पत्याचा नोकर हेमराज याच्या पत्नीच्या याचिकेसोबतच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे

काय आहे आरूषी हत्या प्रकरण?

मे २००८….नोएडा झालेल्या आरूषी तलवार मर्डर प्रकरणाने राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश हादरून गेला. केवळ १४ वर्षाच्या आरूषीचा मृतदेह ती राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. त्यानंतर केवळ दोन दिवसांनी हेमराज या नोकराचा मृतदेह देखील गच्चीवर आढळून आल्याने संपूर्ण प्रकरणाचे गुढ आणखी वाढले. याप्रकरणामध्ये संशयाची सुई फिरली ते पेशाने दंतचिकित्सक तलवार दाम्पत्यावर अर्थात आरूषी तलवारच्या आई-वडिलांवर. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर सीबीआयने तपास करत तलवार दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला. अखेर २६ नोव्हेंबर २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दाम्पत्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या निर्णयाविरोधात तलवार दाम्पत्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. अखेर पुरेशा पुराव्यांअभावी सर्वोच्च न्यायालयाने तलवार दाम्पत्याची १२ ऑक्टोबर २१०७ रोजी सुटका केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायायलामध्ये याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने देखील सीबीआयची याचिका दाखल करून घेतल्याने तलवार दाम्पत्याला तशी नोटीस पाठवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -