घरमनोरंजनराहुल वैद्य आणि रश्मी देसाई झळकणार नव्या प्रोजेक्टमध्ये, शेअर केले फोटो

राहुल वैद्य आणि रश्मी देसाई झळकणार नव्या प्रोजेक्टमध्ये, शेअर केले फोटो

Subscribe

बिग बॉस १४ चा फायनलिस्ट आणि संगीतकार राहुल वैद्य सध्या खतरो के खिलाडीच्या ११ व्या सीजनच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. यातदरम्यान राहुल वैद्यने आपल्या नव्या म्युझिक अल्बमची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राहुलने गर्लफ्रेंड दिशा परमारसोबतचा एक रोमॉंटिक म्युझिक अल्बम रिलीज केला होता. यानंतर आता राहुलने रश्मी देसाईसोबतच्या एका नव्या म्युझिक अल्बमची घोषणा केली आहे. यात राहुल वैद्यसह रश्मी देसाई पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

राहुल वैद्य आणि रश्मी देसाईने आपल्या इंस्टाग्रामवरून या नव्या म्युझिक अल्बमविषयी माहिती दिली आहे. यात राहुल आणि रश्मीने एका खास असा ब्लॉक आउटफिट परिधान केला असून दोघेही जबरदस्त सुंदर दिसत आहेत. यातील काही फोटो राहुलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत लिहिले की, उद्या आमच्या इंस्टाग्राम रिलवर ब्युटीफुल रश्मी देसाईसह काहीतरी सुंदर येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RKV 💫 (@rahulvaidyarkv)

- Advertisement -

त्याचवेळी रश्मी देसाईनेही या नव्या प्रोजेक्टची डेट जाहीर करत लिहिले की, उद्याचा दिवस खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे. तसेच रश्मीने फॅन्सना १६ मे रोजी आपल्या लाईव्ह सेशनला जॉईंड व्हायचे आवाहन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

- Advertisement -

राहुल आणि रश्मीच्या या नव्या पोस्टरमुळे चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. दोघांचा फोटोवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव बोत असून अनेक फॅन्स स्माईली आणि लव्हचे इमोजी शेअर करत आहेत. त्यामुळे राहुल आणि रश्मीचे फॅन्स त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहेत. याशिवाय राहुल वैद्यचा आणखी एक प्रोजेक्ट २० मे रोजी रिलीज होणार आहे. राहुलने ‘छाप तिलक’ नावाच्या या आगामी प्रोजेक्लसाठी आपला आवाज दिला आहे. तर राहुलसह गायक पलक मुचल यांनी साथ दिली आहे.

अलीकडेच गलफ्रेंड दिशा परमार यांच्यासह राहुलने आपला एका नवा म्युझिक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यातील दिशा आणि राहुलचा लग्नााचा आउटफिट पाहून अनेकांनी राहुल आणि दिशाने गपचूप लग्न उरकले की काय असा प्रश्न केला होता, मात्र यानंतर समोर आले की हा राहुलचा नवा म्युझिक व्हिडिओ होता. या म्युझिक व्हिडिओनंतर राहुल चाहत्यांना एकामागून एक नवनव्या प्रोजेक्ट्सची ट्रीट देत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -