घरमनोरंजनराम चरणच्या मुलीचे झाले ग्रँड वेलकम

राम चरणच्या मुलीचे झाले ग्रँड वेलकम

Subscribe

टॉलिवूड अभिनेता राम चरणसाठी 2023 ची सुरुवात खूपच खास झाली होती. त्याच्या RRR चित्रपटामुळे त्याला ग्लोबर स्टार म्हणून सन्मान मिळाला. अशातच, काल (20 जून) रोजी त्याच्या घरी एका गोंडस मुलीने जन्म घेतला. राम चरण आणि त्याची पत्नी उपासना लग्नाच्या 11 वर्षानंतर आई-बाबा झाले. राम चरणच्या आनंदात आता टॉलिवूडमधील अनेक कलाकार सहभागी झाले. अनेकांनी त्याला आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या. अशातच, त्याच्या पत्नीला आणि मुलीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. घरी आल्यावर राम चरणच्या मुलीचे सुंदर स्वागत करण्यात आले. ज्यावेळचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राम चरणच्या मुलीचे झाले ग्रँड वेलकम

सुपस्टार राम चरणच्या पत्नीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात मुलीचे घरामध्ये ग्रँड वेलकम झाल्याचे दिसत आहे. उपासनाने लिहिलंय की, “आमच्या लहान बाळासाठी मिळालेल्या शुभेच्छांसाठी मी खूप आभार व्यक्त करते. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादासाठी धन्यवाद” या फोटोमध्ये उपासनाने हातात मुलीला घेतले आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकजण या फोटोंमध्ये कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

लग्नाच्या 11 वर्षानंतर झाले आई-बाबा

राम चरण आणि उपासना यांचे 14 जून 2012 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या 11 वर्षानंतर यांना आता कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. मुलीच्या जन्माने राम चरण त्याची पत्नी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदात आहे.


हेही वाचा : म्हातारी झालीस… बोलणाऱ्यांना रत्ना पाठक यांनी सुनावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -