घरमनोरंजनलवकरच लग्न करायचं आहे - रणबीर कपूर

लवकरच लग्न करायचं आहे – रणबीर कपूर

Subscribe

माझा लग्नसंस्थेवर नक्कीच विश्वास आहे. मला स्वतःचं कुटुंब हवं आहे आणि लवकरच मी लग्न करेन. रणबीर कपूरनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रणबीर कपूर सध्या दोनच कारणामुळं चर्चेत आहे. एक म्हणजे त्याचा चित्रपट ‘संजू’ आणि दुसरं म्हणजे आलिया भटबरोबर त्याचं नव्यानं सुरु झालेलं नातं. नुकतंच त्यानं आपण आलियाला डेट करत असल्याचं कबूल केलं आहे. रणबीरला लवकरच लग्न करायचं असल्याचं त्यानं नुकतंच सांगितलं आहे.

रणबीर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत?

- Advertisement -

रणबीर आणि आलिया एकमेकांना डेट करायला लागून काहीच अवधी झाला आहे. मात्र रणबीरला आता लग्नाचे वेध लागले आहेत. याआधी रणबीरने दीपिका आणि कतरिनाला डेट केलं होतं मात्र त्यांचं नातं लग्नापर्यंत पोचू शकलं नाही. किंबहुना या नात्यादरम्यान रणबीरनं कधीही लग्नाचा विषयही काढला नव्हता.

लवकरच लग्न करणार असल्याच्या भावना केल्या व्यक्त

लग्नाविषयी विचारलं असता ‘मला २७ वर्षांचा असतानाच लग्न करायचं होतं. साधारण ३० वयामध्ये मला माझी दोन मुलं हवी होती. पण जसा तुम्ही विचार करता तसं आयुष्य मिळतंच असं नाही. माझा लग्नसंस्थेवर नक्कीच विश्वास आहे. मला स्वतःचं कुटुंब हवं आहे आणि लवकरच मी लग्न करेन.’ अशा आपल्या भावना रणबीरनं व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

आलिया आणि रणबीरचं नवं नातं

आलिया आणि रणबीरचं नातं नुकतंच फुलायला लागलं आहे. पण यापूर्वी आलियानंदेखील तिशीच्या आत लग्न करण्याचा इशारा दिला आहे. रणबीर सध्या ३५ वर्षांचा असून आलिया रणबीरपेक्षा १० वर्षांनी लहान आहे पण त्यांची केमिस्ट्री सध्या बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान सध्या रणबीर ‘संजू’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून दुसऱ्या बाजूला ‘ब्रम्हास्त्र’चं चित्रीकरण करत आहे. तसंच ‘शमशेरा’च्या चित्रीकरणाला लवकरच रणबीर सुरुवात करेल. दुसऱ्या बाजूला आलियादेखील ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘कलंक’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -