घरमनोरंजनकर्करोगाच्या यशस्वी लढ्यानंतर ऋषी कपूर यांनी केले फोटोशूट

कर्करोगाच्या यशस्वी लढ्यानंतर ऋषी कपूर यांनी केले फोटोशूट

Subscribe

प्रसिद्ध तसेच नावाजलेले फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी ऋषी कपूर यांचे केले फोटोशूट

बॉलिवूड स्टार ऋषी कपूर हे आपल्या कर्करोगावर न्यूयॉर्कहून उपचार करून भारतात मागच्या महिन्यात परतले आहे. कर्करोगाशी यशस्वी झुंज दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूरने नुकतेच आपले फोटोशूट केले आहे. प्रसिद्ध तसेच नावाजलेले फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी ऋषी कपूर यांचे फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट झाल्यानंतर अविनाश गोवारीकर यांनी ऋषी कपूर यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ऋषी कपूर यांच्या या पोस्ट केलेल्या नवीन फोटोवर चाहते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत. अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

ऋषी कपूर यांचा हा फोटो शेअर करताना विनाश गोवारीकर यांनी ‘हॅश टॅग पोस्ट पॅकअप शूट विद द लेजेंड ऋषी कपूर’ असे कॅप्शन दिले आहे. हाच फोटो अभिनेता ऋषी कपूर यांनी आपल्या ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

- Advertisement -

अभिनेता ऋषी कपूर यांच्यावर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क येथे कर्करोगावर उपचार सुरू असताना देखील ते स्वतः सोशल मीडियावर सक्रीय होते. यावेळी तब्येतीविषयीचे अपडेट्स ते आपल्या चाहत्यांना देत होते. यादरम्यान बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी देखील भेट दिली होती.


हेही वाचा- ‘ही’ मराठी अभिनेत्री न्यूड एमएमएसमुळे आली चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -