घरमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ८०० उमेदवारांचे अर्ज नामंजूर

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ८०० उमेदवारांचे अर्ज नामंजूर

Subscribe

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ५ हजार ५४३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची रविवारी राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल झालेल्या ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ८०० उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

या जिल्ह्यांमध्ये इतक्या उमेदवारांचे अर्ज ठरले वैध 

नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे 

- Advertisement -

धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवार

जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार

- Advertisement -

बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवार

अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवार

वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवार

अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवार

वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवार

नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवार

भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवार

गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवार

गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार

चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवार

यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवार

नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवार

हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवार

परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवार

जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ उमेदवार

औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ उमेदवार

नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ उमेदवार

पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९ उमेदवार,

ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ उमेदवार

मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७६ उमेदवार

मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ उमेदवार

रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ उमेदवार

पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ उमेदवार

अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ उमेदवार

बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२ उमेदवार

लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० उमेदवार

उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ उमेदवार

सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ उमेदवार

सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ उमेदवार

रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० उमेदवार

सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ उमेदवार

कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ उमेदवार

सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवार


हेही वाचायुतीच्या जागावाटपात मित्रपक्षांची नाराजी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -