घरमनोरंजनबाबो...यांचं ठरलं की काय?

बाबो…यांचं ठरलं की काय?

Subscribe

मीराने ने रोहनबरोबर शेअर केलेल्या त्या फोटोमुळे या दोघांमध्ये नेमकं चाललय काय असा प्रश्न चाहत्यांनी थेट मीरालाच विचारला आहे.

आपल्या नृत्याने, अदाकारांनी तरूणांना घायाळ करणारी मीरा जोशीच्या इन्स्टाग्राम पोस्टने सध्या तीचे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. गेले दो दिवस एका मागून एक केलेल्या या पोस्टमुळे तीच्या चाहत्यांच्या मनात एनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मीराने ने रोहनबरोबर शेअर केलेल्या त्या फोटोमुळे या दोघांमध्ये नेमकं चाललय काय असा प्रश्न चाहत्यांनी थेट मीरालाच विचारला आहे.

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_) on

 मीराचं बाबांना खास पत्र

मीराने पहिल्याच पोस्टमध्ये थेट तीच्या बाबांना पत्र लिहीलं आहे. ‘माझं प्रत्येक स्वप्न तू पुर्ण करत आलास आणि मग स्वप्न बघण्याची सवयच लागली. रोहन माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर स्वप्न आहे. ते पुर्ण करण्यासाठी जातेय. मला समजून घे तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. ‘ मीराच्या या पोस्टमुळे तीचे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. तीच्या या पोस्टवर अनेकांनी तर तीला सल्लेच दिले आहेत.

- Advertisement -

rohan- meera
‘स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई बाबांना दुखावणं योग्य नाही….आणि असं पत्र लिहुन जाणं तर मुळीच योग्य नाही…त्यांचा विश्वास जिंका..सर्व ठीक होईल…’, ‘आई बाबा कायमच मुलांना समजुन घेतात त्यांना कोणत्याही प्रकारे दुखवल गेले त्याच्या ईच्छे विरुद्ध कोणतीही गोष्ट घडली तर परमेश्वर पुर्ण काळ चक्र बदलतो आपल्या ईच्छे खातर त्यांना दुःख देणे योग्य नाही’ असे सल्ले तीच्या चाहत्यांनी तीला दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

Sunkissed❤️ #soon #sunkissed

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_) on

मीराच्या स्वप्नातला रोहन

अखेर मीराने आपल्या स्वप्नातल्या रोहनबरोबर पोस्ट शेअर केलीच. या पोस्टमुळे मीराच्या स्वप्नातला रोहन सगळ्यांसमोर आला. रोहनेही हाच फोटो आपल्या इन्स्टावर शेअर केला आहे.
हा एखादा पब्लिसीटी स्टंट आहे? की आता रोहन आणि तीच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे ? हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चेला उधाण आलं आहे.

- Advertisement -

rohan meera

मीराच्या स्वप्नातला हा राजकुमार आहे अभिनेता रोहन गुजर. झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील पिंट्याच्या भुमिकेमुळे प्रेक्षकांची मनात स्वत:ची जागा निर्माण केली होती. तर लवकरच मीरा ‘वृत्ती’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -