घरमनोरंजनसचिन तेंडुलकरच्या मुलीला करायचंय बॉलिवूडमध्ये पदार्पण

सचिन तेंडुलकरच्या मुलीला करायचंय बॉलिवूडमध्ये पदार्पण

Subscribe

मागच्या अनेक वर्षांपासून साराचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट पाहत आहेत. सूत्रांच्या मते, सारा तेंडुलकरला चित्रपटसृष्टीत काम करण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे ती लवकरंच येत्या काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र आता या यादीत शनाया कपूर , सुहाना खान , इब्राहिम खान , पलक तिवारी, अगस्त्य नंदा या सेलिब्रिटी किड्स सोबतचं आगामी काळात सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याची बातमी समोर येत आहे.
मागच्या अनेक वर्षांपासून साराचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट पाहत आहेत. सूत्रांच्या मते, सारा तेंडुलकरला चित्रपटसृष्टीत काम करण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे ती लवकरंच येत्या काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सारा तेंडुलकरला अभिनयाची आवड आहे. त्यामुळे तिने त्याचे प्रशिक्षण सुद्धा घेतलेले आहे. तसेच ती आता काही ब्रँडसाठी जाहिराती सुद्धा करते. सारा सध्या लंडन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. परंतु तिला ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

- Advertisement -

सारा खूप टॅलेंटेड आहे आणि तिला तिच्या करिअरसाठी आई-वडीलांचा पाठिंबा आहे. परंतु अजूनही साराच्या अभिनयाबाबत फारसे कोणाला माहित नाही, त्यामुळे तिला अभिनय करताना पाहून अनेकांना नवल वाटू शकते. सध्या सोशल मीडियावर साराचे लाखो चाहते आहेत.तसेच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

- Advertisement -

मागील काही वर्षांपूर्वी सारा तेंडुलकर अभिनेता शाहिद कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. परंतु त्यावेळी सचिन म्हणाला होता की, “सारा सध्या शिक्षण घेत आहे. सध्या तरी तिचा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा कोणताच विचार नाही, परंतु बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या बातमीने ती नाराज झाली आहे.” मात्र आता पुन्हा सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

 

 

 

रामदेव बाबांच्या आश्रमात रवी राणा आणि नवनीत राणांची झाली होती पहिली भेट ! त्यानंतर सुरू झाली दोघांची लवस्टोरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -