घरमनोरंजनरामदेव बाबांच्या आश्रमात रवी राणा आणि नवनीत राणांची झाली होती पहिली भेट...

रामदेव बाबांच्या आश्रमात रवी राणा आणि नवनीत राणांची झाली होती पहिली भेट ! त्यानंतर सुरू झाली दोघांची लवस्टोरी

Subscribe

2009 ते 2011 दरम्यान मुंबईमध्ये रवी राणा आणि नवनीत राणांची पहिल्यांदा ओळख झाली होती. रवी राणा हे 2009 साली पहिल्यांदाच बडनेरमधून आमदार झाले होत. त्यावेळी बाबा रामदेव यांच्या शिबीरातून त्यांची ओळख झाली. मात्र जेव्हा हे दोघ एकमेकांना भेटले तेव्हा नवणीत अभिनेत्री आणि मॉडेल होत्या.

शिवसेना पक्ष प्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवास्थानी हनुमान चालीसा पठणाच्या मुद्यावरुन अपक्ष आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवणीत राणा हे पती-पत्नी चर्चेत आले आहेत. सध्या राज्यात महागाई, बेरोजगारी, कोरोनाचे पुन्हा एकदा संकट असे मुद्दे बाजुला सारुन आता मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठण हा वाद सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला. आणि यानंतर अमरावतीच्या खासदार नवणीत राणा आणि बडनेरचे आमदार रवी राणा यांनी हाच मुद्दा उपस्थित करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट हनुमान चालीसा पठणाचे आव्हान दिले. यामुळे शिवसेना विरुद्ध राणा दांमप्त्य असा वाद रंगला, मात्र यामध्ये भाजपने राणा दाम्पत्याल पाठिंबा दिला. त्यामुळे हे पती-पत्नी चर्चेत आले आहेत. हे राणा दाम्पत्य नेमकं कोण आहेत? त्यांची लव्ह स्टोरी कशी आहे? या संदर्भात आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

रवी राणा आणि नवनीत राणांची लवस्टोरी

- Advertisement -

2009 ते 2011 दरम्यान मुंबईमध्ये रवी राणा आणि नवनीत राणांची पहिल्यांदा ओळख झाली होती. रवी राणा हे 2009 साली पहिल्यांदाच बडनेरमधून आमदार झाले होत. त्यावेळी बाबा रामदेव यांच्या शिबीरातून त्यांची ओळख झाली. मात्र जेव्हा हे दोघ एकमेकांना भेटले तेव्हा नवणीत अभिनेत्री आणि मॉडेल होत्या. आणि रवी राणा आमदार होते. दक्षिणात्या सिनेसृष्टीत आणि भारतीय सिनेसृष्टीत नवनीत यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. रामदेव बाबांच्या शिबीरात ओळख झाल्यानंतर या ओळखीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. आणि पुढे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्न अगदी साधेपणाने करायचं असं रवी राणा यांनी ठरवलं होतं.

सूत्रांच्या माहितीनुसार रवी राणा आणि नवनीत या दोघांचहीलग्न अमरावतीत एका सामुदायिक विवाह सोहळ्यात झालं. मात्र ते थाटामाटात लग्न करु शकत असताना देखील त्यांनी साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेत आदर्श निर्माण केला होता तसेच लग्नामध्ये होणार खर्च त्यांनी दान केला. सूत्रांच्या माहितीनुसार राणा कुटुंब दरवर्षी साधारण एक लाख गरीब कुटुंबाना दिवाळीमध्ये अन्नधान्याचे दान करते.

- Advertisement -

रवी राणा यांनी राजकारणात येण्यासाठी बडनेर हे विधानसभा क्षेत्र निवडलं. यामागचे कारण म्हणजे या ठिकाणचे अनेक मतदार हे गरीब आणि स्लम भागामध्ये राहणारे आहेत. गरीबांना मदत करण्याच्या दृष्टिने त्यांनी हा मतदार संघ निवडला.असं त्यांचे भाऊ सुनिला राणा यांनी सांगितले. पहिल्याच निवडणूकीत त्यांनी बाजी मारली आणि सलग 3 वेळा त्यांनी ही निवडणूक जिंकली.

राजकारणा व्यतिरिक्त अमरावतीत रवी राणा यांचा इमारती उभारणीचा व्यावसाय आहे. तर नवणीत राणा यांचा जन्म मुंबईत झाला असून त्याचे वडील मुळचे पंजाबचे आहेत. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. नवनीत कौर यांनी बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी छंद म्हणून मॉडेलिंग सुरू केलं. एक चांगल्या मॉडेल म्हणून काम करत असतानाच त्या अभिनेत्री झाल्या. मॉडेलिंग करत असताना त्यांनी म्युझिक अल्बम मध्येही काम केलं. लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी देखील राजाकारणात सहभाग घेतला. त्यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या बाजुने तिकिट मिळवले, मात्र शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला. यानंतर नवनीत राणा यांनी 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला, तेव्हापासूनच राणा दांम्पत्य आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद सुरू आहे.

 

पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं; अभिनेता प्रतीक गांधीने शेअर केला मुंबई पोलिसांचा वाईट अनुभव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -