घरCORONA UPDATEVideo: करिना, सैफ, तैमूर आले मरिन ड्राईव्हवर फिरायला; पण त्यांना ऐकावे लागले...

Video: करिना, सैफ, तैमूर आले मरिन ड्राईव्हवर फिरायला; पण त्यांना ऐकावे लागले भलतेच

Subscribe

तब्बल तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर हळूहळू मुंबई पूर्वपदावर येत असून सिनेकलाकारांनाही घराबाहेर पडून मोकळा श्वास घेण्याचा मोह आवरला नाही. बॉलीवूडची हॅप्पी फॅमिली सैफ अली खान, करिना कपूर आणि त्यांचा मुलगा तैमूर हे रविवारी मुंबईच्या मरिन ड्राईव्ह येथे भटकंती करण्यासाठी आले होते. मात्र अनलॉकचे काही नियम असून सैफ आणि करिना त्यापासून अनभिज्ञ असल्याचे पाहालया मिळाले. तैमूर अजून खुप लहान असून त्याला बाहेर फिरण्यास मुभा नसल्याचे सैफ व करिनाला सांगण्यात आले. सध्या लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथील होत असले तरी लहान मुलं आणि वयोवृद्धांना घराबाहेर पडण्यास सरकारने मनाई केली आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून खबरदारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पंरतू लहान मुलांना घराबाहेर आणायचे नाही, हा नियम माहिती नसल्याचे सैफ-करिनाच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

सैफ-करिनानेही लावले मास्क 

मुंबईमध्ये नुकताच मुसळधार पाऊस पडून गेला आहे. त्यामुळे शहरातील वातावरण खुपच आनंददायी झाले आहे. अशातच सरकारनेही लोकांनी सकाळी ५ सायंकाळी ७ वाजेपर्यंत फिरण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे जुहू चौपाटी, जॉगर्स पार्क, वांद्रे सी फेस, मरिन ड्राईव्ह येथे लोकांची ये-जा काही प्रमाणात सुरू झाली आहे. अशातच सैफ आणि करिनादेखील आपल्याला मुलाल घेऊन मरिन ड्राईव्ह येथे आल्याचे पाहायला मिळाले. सोबत तैमूरचा सांभाळ करणारी नॅनीदेखील आहे. तसेच या सर्वांनी नियमांचे पालन करत मास्क लावल्याचेही व्हिडिमध्ये पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

केजरीवाल यांच्यात आढळली कोरोनाची लक्षणे, कोरोनाची चाचणी होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -