घरमनोरंजनबॉक्स ऑफिसच्या 'रेस'मध्ये 'संजू' पुढे

बॉक्स ऑफिसच्या ‘रेस’मध्ये ‘संजू’ पुढे

Subscribe

पहिल्या दिवसापासून असणाऱ्या 'संजू'नं यावर्षीचा पहिल्या दिवसाच्या कमाईत बाजी मारली आहे. रणबीर कपूरनं साकारलेल्या संजय दत्तच्या भूमिकेला सध्या सर्वच स्तरातून वाहवा मिळत आहे.

बॉलीवूडमध्ये सणाच्या आसपास चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी खूपच चढाओढ असते. त्यातही सलमान खाननं दरवर्षी ईद हा सण जणू काही बुकच करून ठेवला आहे. निर्मात्यांना सहसा सलग सुट्ट्या लागून येण्याच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करायचा असतो, जेणेकरून बॉक्स ऑफिस कलेक्शन उत्तम मिळेल. मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला सारत राजकुमार हिराणीच्या ‘संजू’नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सलमान खानच्या ‘रेस ३’ आणि टायगर श्रॉफच्या ‘बागी २’ ला मागे टाकून ‘संजू’ सर्वात जास्त ओपनिंग कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्याच दिवशी ३४ कोटीची कमाई करत ‘संजू’नं बाजी मारली आहे.

- Advertisement -

‘संजू’ची पहिल्या दिवशीची कमाई

संजय दत्तची भूमिका या चित्रपटामध्ये रणबीर कपूरनं अतिशय चांगली साकारली असल्याची चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये रंगत असून चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात जास्त ओपनिंग कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे. रणबीर कपूरला गेल्या बरेच वर्षात म्हणावा तसा हिट चित्रपट मिळाला नव्हता. मात्र या चित्रपटानं त्याचं संपूर्ण करिअर बदलण्याची शक्यता आहे. याआधी रणबीरच्या ‘बेशरम’नं ओपनिंगला २१.५६ कोटी तर ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटानं १९.४५ कोटी रुपये कमावले होते. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शनं दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये या चित्रपटानं पहिल्याच दिवशी ३४.७५ कोटी कमावले असून या विकेंडलाच कदाचित १०० कोटीचा आकडा हा चित्रपट पार करू शकेल. सलमान खानच्या ‘रेस ३’नं पहिल्या दिवशी २९.१७ कोटी कमावले होते, तर टायगर श्रॉफच्या ‘बागी २’नं पहिल्या दिवशी २५.१० कोटी कमावले होते. या यादीत रणवीर कपूर, दीपिका पडुकोन आणि शाहीद कपूरच्या ‘पद्मावत’ला चौथा क्रमांक मिळाला असून १९ कोटी कमाई या चित्रपटानं केली होती.

- Advertisement -

‘संजू’ची पहिल्यापासूनच होती चर्चा

‘संजू’ची पहिल्या दिवसापासूनच चर्चा होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणीनं केलं असून त्यांचा प्रत्येक चित्रपट काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो हे त्यांनी परत एकदा सिद्ध केलं आहे. हा चित्रपट संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असून रणबीर कपूरनं उत्कृष्ट भूमिका साकारल्याचीच सध्या चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -