घरमनोरंजन'हा' आहे सारा अली खानचा नवा सिनेमा...

‘हा’ आहे सारा अली खानचा नवा सिनेमा…

Subscribe

एका खासगी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सारा ही करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या एका बायोपिकमध्ये झळकणार आहे. 

‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ अशा बॅक टू बॅक दोन सिनेमांंमधून अभिनेत्री सारा अली खानने बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. साराने अल्पावधीतच तिच्या अभिनयाच्या आणि साधेपणाच्या जोरावर देशभरातील लोकांची मनं जिंकून घेतली. सैफ अली खान आणि अमृता राव या स्टार्सची मुलगी असल्यामुळे साराकडून प्रेक्षकांच्या आणि इंडस्ट्रीच्या खूप अपेक्षा होत्या. या अपेक्षांवर सारा यशस्वीपणे खरी उतरल्याच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत. दरम्यान, सिम्बा गर्ल साराचा पुढचा सिनेमा कोणता असणार? सारा कोणत्या नव्या अवतारात मोठ्या पडद्यावर झळकणार? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत. साराच्या आगामी सिनेमाविषयी गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चाही रंगत आहेत. या सगळ्याच्या धर्तीवर आता साराच्या नवीन सिनेमांचं नाव समोर आलं आहे. सूत्रांनुसार, साराच्या पदरात आता एक ‘बिग बजेट’ सिनेमा पडला आहे. एका खासगी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सारा ही करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या एका बायोपिकमध्ये झळकणार आहे.

बायोपिकमध्ये झळकणार सारा?

सारा अली खान काम करणार असलेल्या या बायोपिकचे दिग्दर्शन कन्नन अय्यर करणार आहेत. अय्यर यांनी याआधी ‘एक थी डायन’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. मात्र, बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर ह आपली छाप पाडण्यामध्ये हा सिनेमा अयशस्वी ठरला होता. त्यामुळे या आगामी बायोपिकच्या माध्यमातून अय्यर पुन्हा एकदा दिग्दर्शन क्षेत्रात दमदार आगमन करणार असल्याचं समजतंय. हा बायोपिक नक्की कुणाच्या जीवनावर आधारित आहे? तसंच त्याचं नाव काय असणार आहे? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या सिनेमात सारा अली खान झळकणार असल्याचं वृत्ताला दुजोरा दिला जात आहे.

- Advertisement -

सारा – जान्हवीची टक्कर?

दरम्यान, साराला बायोपिकची ही ऑफर मिळाल्याच्या चर्चेमुळे तिची तुलना आता थेट जान्हवी कपूरशी केली जात आहे. याचं कारण म्हणजे जान्हवी कपूरनेही एक बायोपिक साईन केल्याचं म्हटलं जात आहे. इंडियन एअरफोर्सची पहिल्या भारतीय महिला पायलट ‘गुंजन सक्सेना’ यांच्या बायोपिकमध्ये जान्हवी काम करणार आहे. याशिवाय जान्हवी धर्मा प्रॉडक्शनच्याच ‘तख्त’ या आगामी बीग बजेट सिनेमातही झळकणार आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये साधारण एकाचवेळी पदार्पण केलेल्या सारा आणि जान्हवीमध्ये, येत्या काळात टक्कर होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, सारा अली खानने ‘बागी ३’ हा सिनेमाही साईन केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -