घरमनोरंजन'दबंग ३' मधून मलायका अरोरा बाहेर

‘दबंग ३’ मधून मलायका अरोरा बाहेर

Subscribe

सलमान खान याचा दंबग ३ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दंबग ३ च्या आयटम साँगमध्ये करिना कपूर दिसणार आहे.

निर्माता अरबाज खान आणि सलमान खान यांचा ‘दंबग ३’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या दंबग चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. दंबग १ आणि २ या दोन्ही चित्रपटामधील आयटम साँगला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं. ‘मुन्नी बदनाम’ आणि ‘फेविकॉल से’ या गाण्याने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं. दंबग ३ मध्ये देखील आयटम साँग असणार आहे. परंतू या आयटम गाण्यात मलायका अरोरा दिसणार नसल्याचे सांगितले जात आहे. तिच्याऐवजी करिना कपूर या गाण्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याआधीही करिना कपूर दबंग २ मध्ये फेविकॉल से, या आयटम साँगमध्ये दिसली होती.

अरबाज – मलायकाचा घटस्पोट

गेल्याच वर्षी अरबाज आणि मलायकाचा घटस्पोट झाला आहे. त्यामुळे मलायका या चित्रपटामध्ये दिसणार नाही, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अरबाज आणि मलायका यांच्या घटस्पोटानंतर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्यामध्ये रिलेशनशीप असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यामुळे सलमान खान आणि अर्जुन यांच्यातील नात्याला तडा गेला आहे.

- Advertisement -

वाचा-‘दबंग ३’मधून अश्वमीचं पदार्पण?

दबंग ३ मध्ये नवा चेहरा 

तसेच दबंग ३ मध्ये महेश मांजरेकर यांची कन्या अश्वमी मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. दबंग ३ चे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहे. या चित्रपटामध्ये सोनाक्षी सिन्हा नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. दबंग १, २ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे दबंग ३ प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -