घरमनोरंजनकार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा 'सत्यप्रेम की कथा' 29 जून 2023 रोजी...

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा ‘सत्यप्रेम की कथा’ 29 जून 2023 रोजी होणार प्रदर्शित

Subscribe

'सत्यप्रेम की कथा' ही आगामी संगीतमय प्रेमकथा आहे ज्याची घोषणा झाल्यापासूनच चर्चेचा विषय बनली आहे.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी अभिनित नमाह पिक्चर्स, समीर विद्वांस दिग्दर्शित, साजिद नाडियादवालाचा बहुप्रतिक्षित चित्रपट – ‘सत्यप्रेम की कथा’ 29 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. शूटिंगच्या सुरुवातीपासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ ही आगामी संगीतमय प्रेमकथा आहे ज्याची घोषणा झाल्यापासूनच चर्चेचा विषय बनली आहे. या चित्रपटाद्वारे कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दुसऱ्यांदा एकमेकांसोबत पडद्यावर दिसणार आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं बदलण्यात आलं नाव

- Advertisement -

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा आगामी ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचं मागील काही दिवसांपूर्वी नाव बदण्यात आलं. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच चित्रपचटाच्या नावावरूनही वाद सुरू झाला होता. अनेकांनी या चित्रपटाला हिंदू धर्माविरोधात असल्याचं म्हटलं, त्यानंतर आता निर्मात्यांनी सत्यनारायण की कथा हे नाव बदलून ‘सत्यप्रेम की कथा’ हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला.

‘सत्यप्रेम की कथा’देखील एनजीई आणि नमाह पिक्चर्स यांच्यातील मोठ्या सहकार्याचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे, किशोर अरोरा आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्यासह साजिद नाडियाडवाला आणि शरीन मंत्री केडिया यांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. सत्यप्रेम की कथा 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.


हेही वाचा : ‘लायगर’ चित्रपटाने केली कोटींची कमाई; ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ला देखील टाकलं मागे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -