‘लायगर’ चित्रपटाने केली कोटींची कमाई; ‘लाल सिंह चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’ला देखील टाकलं मागे

'लायगर' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई समोर आली असून या चित्रपटाने अक्षय कुमार आणि आमीर खानच्या चित्रपटांना मागे टाकायला सुरूवात केली आहे.

टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘लायगर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षका मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. विजय देवरकोंडा पहिल्यांदाच बॉलिवूडमधील हा पहिला चित्रपट असल्यामुळे विजय देवरकोंडाचे अनेक चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटात विजयसोबत अभिनेत्री अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.

‘लायगर’ करणार बॉक्स ऑफिसवर कमाल?
‘लायगर’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई समोर आली असून या चित्रपटाने अक्षय कुमार आणि आमीर खानच्या चित्रपटांना मागे टाकायला सुरूवात केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई
बॉक्स ऑफिसने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी एकूण 27 ते 29 कोटींची कमाई करेल. तेलगुमध्ये हा चित्रपट जवळपास 24.5 कोटींची कमाई करू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र लायगर चित्रपटाने हिंदी भाषेत फारशी कमाई केलेली नाही. लायगर ने हिंदी भाषेत 2.50 ची कमाई केली आहे. परंतु ही कमाई लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधन चित्रपटापेक्षा जास्त आहे.

दरम्यान, विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या ‘लायगर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच चाहते खूप खूश झाले आहेत. विजयची अॅक्शन पाहून सगळेच त्याचे दिवाने झाले आहेत. 2021 मध्ये या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली होती. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.


हेही वाचा :http://खूप बोलावसं वाटतं, पण…बॉलिवूडच्या बहिष्कारावर अमिताभ बच्चन यांचा निशाणा?