घरमनोरंजन'गोष्ट एका पैठणीची'साठी सायली, सुव्रतने केली 'ही' गोष्ट

‘गोष्ट एका पैठणीची’साठी सायली, सुव्रतने केली ‘ही’ गोष्ट

Subscribe

आपल्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय मिळावा, याकरता प्रत्येक कलाकार हर प्रकारे प्रयत्न करत असतो, अभ्यास करत असतो आणि त्यातूनच ती भूमिका अधिक बहरते. असेच प्रयत्न सायली संजीव आणि सुव्रत जोशीनेही केले आहेत. शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’मध्ये सायली संजीवने शिवणकाम करण्याऱ्या गृहिणीची भूमिका साकारली आहे तर सुव्रत जोशीने फुलवाल्याची. या भूमिका दिसताना जरी साध्या, सोप्या दिसत असल्या तरी यासाठी दोघांनीही अभ्यास केला आहे. ज्यामुळे या व्यक्तिरेखा या पात्रांशी हुबेहूब मिळत्याजुळत्या वाटतात. सायलीला कोणतीही भूमिका साकारताना त्या भूमिकेशी एकरूप व्हायला आवडते. तर सुव्रतलाही भूमिकेचा अभ्यास करणे महत्वाचे वाटते.

सायली याबद्दल सांगते, ” या चित्रपटात मी शिवणकाम करणारी साधी गृहिणी आहे, जी आजूबाजूच्या बायकांच्या साड्यांना फॉल बिडिंग करून देते, ब्लाऊज शिवून देते. अभिनयाच्या जोरावर ही भूमिका नक्कीच साकारता आली असती. परंतु त्यात नैसर्गिकता आणण्यासाठी, त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी मी दोन दिवसांचा शिवण क्लास लावला. ‘गोष्ट एका पैठणीची’मध्ये मी अतिशय जुन्या काळातील मशीनवर काम करतेय. त्यामुळे मला शिलाई मशीन हाताळणे, सुईमध्ये दोरा भरणे, तेल टाकणे या सगळ्या गोष्टी माहित असणे, गरजचे होते. कुठेही माझा अभिनय अनैसर्गिक वाटू नये, असे मला मनापासून वाटत होते. म्हणूनच कोणालाही कळू न देता मी हा क्लास लावला होता. ज्यामुळे मला शिवणकामातील बारकावे शिकता आले. ज्याचा मला ‘गोष्ट एका पैठणीची’मध्ये फायदा झाला. मुळात कोणतीही भूमिका साकारताना त्यात मन ओतून काम केले तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.” तर सुव्रत जोशी म्हणतो, ” मी एका फुलवाल्याची भूमिका साकारत आहे. वरवर पाहता या भूमिका अगदी सहज करता येण्यासारख्या असल्या तरी यासाठी निरीक्षण आवश्यक आहे. गजरे, हार विणण्याची पद्धत, हाताच्या हालचाली या सगळ्याच गोष्टी आत्मसाद करायच्या होत्या. म्हणूनच मी तासनतास फुलवाल्यांच्या बाजूला उभं राहून त्यांचे निरीक्षण करायचो. जेणे करून ती व्यक्तिरेखा साकारताना त्यात सहजता यावी.”

- Advertisement -

‘गोष्ट एका पैठणीची’ची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -