घरमनोरंजनशाहरुख आजकाल रणवीर, रणबीरसारखे रोल करतोय, महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया

शाहरुख आजकाल रणवीर, रणबीरसारखे रोल करतोय, महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा प्रदर्शनांच्या मार्गावर आहे. नुकताच या सिनेमाच ट्रेलर रिलीज झाला झाल्याने चाहतेही आता अंतिम सिनेमाची आतुरतेने वाटं पाहतायत. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केल आहे. त्यामुळे नेमकं या सिनेमातून दबंग खान काय कल्ला करतो याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. नुकताच महेश मांजरेकरांनी या सिनेमाविषयी एका वृत्तवाहिनीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, यावेळी त्यांनी शाहरुख खानच्या सिनेसृष्टीतील भूमिकेवरही आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली.

“शाहरुख आजकाल रणवीर, रणबीरसारखे रोल करतोय, तो काही नवं करत नसून तो आपल्या कलेला न्याय देत नसल्याचे वाटतेय” असं मत मांजरेकरांनी व्यक्त केल आहे. “शाहरूख खानने चौकटीतून बाहेर येण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणि तेवढी ताकद आहे” असंही ते म्हणाले.

- Advertisement -

“आपल्या टॅलेंटला न्याय न देणार अभिनेता म्हणजे शाहरुख खान, आपल्या चौकटीबाहेर येऊन देणं ही त्याची अडचण आहे. माझा एखादा सिनेमा चांगला चालला म्हणजे मी चॉकलेट बॉय झालो अशा भरावशावर तो असतो. त्याला चौकटीतून बाहेर यावं लागेल. आजकाल तर तो रणवीर सिंह आणि रणबीर कपूरसारख्या भूमिका साकारतोय. अशा परिस्थितीत शाहरुखला पाहण्यासाठी प्रेक्षक का जातील? प्रेक्षक त्याला अशा भूमिकेत पाहू इच्छितात जी भूमिका केवळ शाहरुखसाठी बनली आहे. शाहरुखने चौकटीतून बाहेर येत काही तरी वेगळं करू पाहावे. तो एक उत्तम अभिनेता आहे,” असं महेश मांजरेकर म्हणाले. महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -