घरमहाराष्ट्रनाशिकइन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो; प्रेयसीसमोर प्रियकराचा खून

इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो; प्रेयसीसमोर प्रियकराचा खून

Subscribe

मनमाड रेल्वे स्थानकावर प्रेयसी आणि प्रवाशांसमोर हल्लेखोरांनी केला खून

नाशिक : अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीच्या मित्रांचे इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो टाकल्याने टोळक्याने प्रियकराची धारदार चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.६) मध्यरात्री २ वाजेदरम्यान मनमाड रेल्वे स्थानकावर घडली.

हल्ल्याची घटना प्रेयसी आणि प्रवाशांसमोर घडल्याने पळापळ सुरु झाली होती. हल्लेखोर नंदीग्राम एक्सप्रेसने मुंबईकडे गेले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शिवम पवार (रा. ऊसवड, ता.चांदवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवमची उल्हासनगर, कल्याण येथील तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर अडीच वर्षांपूर्वी ओळख झाली. ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, शिवमची तिच्या मित्रांशी ओळख झाली. मात्र, मित्रांचे तिच्यासोबत अनैतिक संबंध असावेत, असा संशय शिवमला होता. त्यातून त्याने दोघांच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट सुरू करत त्यावर अश्लिल फोटो अपलोड केले. त्यातून त्यांच्यात भांडण झाले होते. वाद मिटवण्यासाठी प्रेयसी, तिचे मित्र आणि शिवम मनमाड रेल्वे स्थानकात आले. त्यावेळी राग अनावर झाल्याने टोळक्याने शिवमवर चाकूने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -