घरमनोरंजनचालत्या ट्रेनच्या दरवाजात बसून व्हिडीओ काढणं सोनू सूदला पडलं महागात

चालत्या ट्रेनच्या दरवाजात बसून व्हिडीओ काढणं सोनू सूदला पडलं महागात

Subscribe

कोरोना महामारीच्या काळात देशातील लॉकडाऊन दरम्यान प्रवासी कामगारांच्या मदतीला धाऊन आलेला अभिनेता सोनू सूद सतत चर्चेत असतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोनू सूदने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये सोनू सूद चालत्या ट्रेनच्या दरवाज्याच्या जवळ बसलेला दिसत आहे.

खरंतर, 22 सेकंदाचा हा व्हिडीओ असून हा 13 डिसेंबर रोजी हा पोस्ट करण्यात आला होता. सोनू सूदने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकजण त्याच्यावर नाराज झाले आहेत. कारण सोनू सूद ज्याप्रकारे ट्रेनच्या दरवाजा जवळ बसला आहे ते खूप भीतीदायक आहे. या व्हि़डीओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करु लागले आहेत.

- Advertisement -

या व्हिडीओवर जीआरपी मुंबईने देखील ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, “@Sonusood फुटबोर्डवर प्रवास करणं चित्रपटांमध्ये मनोरंजनाचे स्त्रोत आहे. खऱ्या आयुष्यात नाही. चला सर्वांनी नियमांचे पालन करा आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

- Advertisement -

हेही वाचा :

वीणा कपूर जिवंत; मुलाने हत्या न केल्याचा खुलासा करण्यासाठी स्वतः गाठलं पोलीस ठाणे

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -