घरमनोरंजनसोनाक्षी सिन्हाची नवी वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला

सोनाक्षी सिन्हाची नवी वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

महिला दिनाचे औचित्य साधून सोनाक्षीने पोस्टर शेअर केले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने प्रेक्षकांसाठी तिच्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सोनाक्षी अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरीजमध्ये मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अजूनतरी वेबसीरीजचे नाव आणि तारीख जाहीर केले नाही. पोस्टमध्ये सोनाक्षीच्या नव्या भूमिकेबाबतचा  नवा अंदाज प्रेक्षकांना दिसून येणार आहे. महिला दिनाचे औचित्य साधून सोनाक्षीने पोस्टर शेअर केले आहे. या वेबसीरीजमध्ये सोनाक्षी खाकी वर्दीतील महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षी या पोस्टमध्ये रेल्वे रुळाच्या पटरीवर उभी आहे. या फोटोमध्ये तिचा दमदार अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, महिला यशाचे शिखर कितीही उंच असूदे त्या तो पार करतातच. महिला आणखी काय काय साध्य करु शकतात याची जाणीव आपल्याला पदोपदी येते. हेच दाखवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, अशा आशयाचे कॅप्शन सोनाक्षीने लिहिले आहे. सोनाक्षी सिन्हासह या वेबसीरीजमध्ये अभिनेता विजय शर्मा , गुलशन देवया आणि सोहम शहा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेबसीरीजचे दिग्दर्शन रिमा कागती आणि रुचिका अग्रवाल यांनी केले आहे. या वेबसीरीजमध्ये सोनाक्षीचा दबंग लुक दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

- Advertisement -

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, यासोबतच सोनाक्षी अजय देवगणच्या ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.


हेही वाचा – Maharashtra Budget 2021 Live Updates: विधानसभा कामकाज २० मिनिटांसाठी स्थगित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -