घरमहाराष्ट्रसुशांतसिंह राजपूतला ड्रग्स पुरवणारा मुख्य आरोपी NCBच्या ताब्यात

सुशांतसिंह राजपूतला ड्रग्स पुरवणारा मुख्य आरोपी NCBच्या ताब्यात

Subscribe

गोव्यात NCBची मोठी कारवाई सुरु

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे. या तपासादरम्यान बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन समोर आले होते. यातच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गोव्यात मोठी कारवाई केली आहे. सुशांत सिंह राजपूतला ड्रग्स पुरवणाऱ्या मुख्य ड्रग्स माफियाला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. गोव्यात एनसीबीने ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान मुंबई  सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनसीबीच्यावतीने दाखल करण्यात आलेलं हे आरोपपत्र ३० हजार पानी असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने २०० जणांचे जबाब नोंदवले असून, ३० हजार पानांच्या या आरोपपत्रात १२ हजार पानांची हार्ड कॉपी आणि सीडीमधील पुराव्यांचा देखील समावेश आहे. एनसीबीने दाखल केलेल्या या चार्जशीटमध्ये ३३ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, सुशांत राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्जसंदर्भातील कित्येक गोष्टी समोर आल्यानंतर आता एनसीबीने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. गेले सात ते आठ महिने उलटून गेल्यानंतर देखील हा तपास अद्याप सुरूच आहे. यानंतर अनेक पुरावे हाती लागल्यानंतर एनसीबीकडून हे आरोपपत्र दाखल केले आहे. या चार्टशीटमध्ये रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांच्यासह एकूण ३३ जण आरोपींची नावे आहे. यामध्ये सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचा जबाब आहे, परंतु आरोपी म्हणून नाव नाही. मात्र धर्मा प्रोडक्शन्सचा माजी कर्मचारी क्षितिज प्रसाद, अर्जुन रामपालचा मेव्हणा अजीसीलाओस दिमिटरीटास याचेही नाव आहे अशी माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यात अनेक ड्रग्स माफियांना ताब्यात घेतले. यावेळी अनेक घातक ड्रग्स पदार्थ, अनेक मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या मोबाईलमधून अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असल्याची माहिती या दोषपत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

याचदरम्यान सुशांत सिंह राजपूतला ड्रग्स पुरवणाऱ्या मुख्य आरोपीला एनसीबीने गोव्यातून ताब्यात घेतले आहे. यानंतर गोव्यात आता एनसीबीकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. गोव्यातील काही ठिकाणी एनसीबीने छापे टाकले असून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केल्याने माफियांचे धाबे दणाणले आहे. काही ड्रग्स माफियांनाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे. या गोव्यातील कारवाई दरम्यान सुशांतसिंह राजपूतला ड्रग्स पुरवणाऱ्या माफियाला एनसीबीने ताब्यात घेतले.
एनसीबीने तीन जणांना अटक केली आहे, असे एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले.


हेही वाचा- SSR Drugs Case: एनसीबीचे आरोपपत्र दाखल, रियासह ३३ जणांचा समावेश

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -