घरमनोरंजन'माझ्यासोबत कोणी काम करायला तयार नाही'; आरोपांनी वैतागलेल्या सूरज पांचोलीची खंत

‘माझ्यासोबत कोणी काम करायला तयार नाही’; आरोपांनी वैतागलेल्या सूरज पांचोलीची खंत

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या अकाली झालेल्या निधनामुळे अनेक चर्चांना उधाण आहे. सुरूवातील काही सेलिब्रिटींना हा मुद्दा नेपोटिझमकळे वळवला. तेव्हा एक नाव समोर आले ते म्हणजे सूरज पांचोली याचे. अभिनेता आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोली. त्याला दंबग सलमान खान याने चित्रपटांमध्ये ब्रेक दिला होता. त्यामुळे सूरज आणि सुशांतमध्ये झालेल्या अनबनीनंतर सलमना सुशांतवर डूग धरून असल्यानेच त्याला चित्रपटांमधून काढले जात असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, पहिल्यांदा या सर्व प्रकरणावर सूरज पांचोली याने वक्तव्य केले असून आपला कोणत्या घटनेशी संबंध नसल्याचे त्याने म्हटले आहे.

सूरज पांचोली यांने आज तक या हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझा सुशांत किंवा दिशा सलानिया यापैकी कोणाच्याशी मृत्यूशी काहीही संबंध नाही. १३ जून रोजी माझ्या घरी पार्टी होती, तिथे सुशांत आला होता आणि दुसऱ्या दिवशी सुशांतने आत्महत्या केली. असे सांगितले जात आहे. मात्र माझ्या घरी कोण पार्टी नव्हतीच, असे सूरजने यावेळी बोलताना सांगितले. मी सुशांत १ ते २ वेळाच भेटलो असेन. आमच्या खुप कमीवेळा संवाद झाला आहे. सुशांतसोबत माझी ओळख सामान्य होती. त्याच्यासोबत कसलीही दुश्मनी नव्हती. आम्ही एकमेकांना भावा म्हणून हाक मारायचो. तो मला लहान भाऊ म्हणायचा. आम्ही कधीही एकत्र काम केले नाही. आम्ही एकमेकांचा आदर करायचो.

- Advertisement -

नेपोटिझमबाबत सूरजला विचारले असता तो म्हणाला की, सुशांत नेपोटिझमचा शिकार होत होता की नाही मला माहिती नाही. मात्र सोशल ट्रोलिंग होत होती. मीडियामधील हे ब्लाईंड आयटम बंद व्हायला हवेत. तसेच माझ्यावर सध्या दोन केसेससंबंधी नाव जोडले जात आहे. जिया खान आणि सुशांत सिंह आत्महत्यांमध्ये माझे नाव जोडले जात आहे. त्यामुळे माझी इमेज बिघडली आहे. कोणीही माझ्यासोबत काम करायला लगेच तयार होत नाही. गेल्या ८ वर्षांपासून मी याचा सामना करत आहे.

हेही वाचा –

Mumbai Police Salute : मनोधैर्य वाढवा, खच्चीकरण करू नका; सुप्रिया सुळे यांचे सुचक ट्विट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -