घरताज्या घडामोडीअमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. याचा विळखा आता राजकीय नेत्यांना देखील होऊ लागला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या घरातील आतापर्यंत ११ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांचा, सासू-सासऱ्यांचा समावेश असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचारा सुरु आहेत. तर पती रवी राणाचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सासू-सासऱ्यांनाही कोरोनाची लागण

आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा यांची काही दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्याच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

- Advertisement -

या चाचणीचे अहवाल आले असून यामध्ये आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – Corona: २४ तासांत १३७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; २ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -