घरमनोरंजनराजस्थानच्या सुमन रावने पटकावला 'हा' मानाचा किताब!

राजस्थानच्या सुमन रावने पटकावला ‘हा’ मानाचा किताब!

Subscribe

राजस्थानच्या सुमन राव हिनं 'फेमिना मिस इंडिया २०१९' चा मुकूट पटकावला आहे.

फेमिना मिस इंडिया २०१९ चा ताज राजस्थानच्या सुमन रावने जिंकला आहे.गेल्यावर्षी तमिळनाडूच्या अनुकृती दासने हा ताज जिंकला होता. गेल्यावर्षी २०१८ची विजेती मिस इंडिया अनुकृती दास हिने सुमनला हा मानाचा ताज घातला.

- Advertisement -

२२ वर्षीय सुमन रावने फेमिना मिस इंडिया२०१९ चा हा ताज जिंकत आपलं स्वप्न पुर्ण केलं आहे. हा सोहळा सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडिअममध्ये फेमिना मिस इंडिया २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हुमा कुरेशी, चित्रंगदा सिंग, रेमो डिसूजा, विकी कौशल आणि आयुष शर्मा, मिस वर्ल्ड २०१८ वेनेसा पोंसे, शहाने पिकॉक, मुकेश छाबरा हे सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

फेमिना मिस इंडिया २०१९ स्पर्धेत एकूण ३० स्पर्धक होत्या. तेलंगनाची संजना विज उपविजेती ठरली. बिहारच्या श्रेया शंकरने मिस इंडिया यूनायटेड कॉन्टिनेंट २०१९ चा किताब जिंकला. छत्तीसगढच्या शिवानी जाधवने मिस ग्रँड इंडिया २०१९ चा किताब जिंकला. करण जोहर, मनीष पॉल आणि माजी मिस इंडिया मानुषी छिल्लरने हा शो होस्ट केला.

कोण आहे सुमन राव

सुमन सध्या चार्टड अकाउंटची तयारी करत आहे. गेल्यावर्षी सुमनला हा किताब जिंकता आला नव्हता. २०१८ मध्ये ती फर्स्ट रनरअप ठरली होती. फेमिना मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर आता सुमन मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल.७ डिसेंबर रोजी थायलंडच्या पट्टाया येथे होणाऱ्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताकडून सुमन राव सहभागी होणार आहे.

फेमिना मिस २०१९ चा किताब जिंकल्यानंतर सुमन म्हणाली,माझ्या आईवडिलांनी मला घडवले. त्यांच्याकडून मी खूप काही शिकले. मिस इंडिया 2019चा ताज जिंकणे ही माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -