घरमहाराष्ट्रमंत्रिमंडळातून 'या' सहा जणांना डच्चू; मुख्यमंत्र्यांनी स्विकारले राजीनामे!

मंत्रिमंडळातून ‘या’ सहा जणांना डच्चू; मुख्यमंत्र्यांनी स्विकारले राजीनामे!

Subscribe

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये १३ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली असून सहा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये १३ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. राजभवनावर आज, रविवारी पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. तसेच सोमवारपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील सुरू होत आहे. त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेल्या अनेक दिवसांपासून बरेच इच्छुक वाट पाहात होते. हमारा नंबर कब आयेगा? यासाठी महायुतीचे अनेक नेते देव पाण्यात ठेऊन बसले होते. अखेर हा दिवस आला. अनेकांनी आपली मंत्रिपदावर वर्णी लागावी म्हणून गेल्या दोन दिवसांपासून जोरदार लॉबिंग सुरू केले होते. मात्र, काहींच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडली तर काहींच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडली. तर काहींना डच्चू देण्यात आले आहेत.

या मंत्र्यांना डच्चू

  • प्रकाश मेहता
  • विष्णू सावरा
  • राजकुमार बडोले
  • राजे अत्राम
  • दिलीप कांबळे
  • प्रविण पोटे

मुंबईतील एमपी मिल कम्पाऊंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर मंत्रीपद गमावण्याची वेळी आली आहे. याशिवाय आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व मंत्री भाजपचे असून या मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे राजीनामे स्विकारले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -