घरमनोरंजनसुशांत सिंह राजपूतला Dil Bechara टीमने वाहिली सांगितिक श्रद्धांजली!

सुशांत सिंह राजपूतला Dil Bechara टीमने वाहिली सांगितिक श्रद्धांजली!

Subscribe

हा संपूर्ण अल्बम तुम्हाला देखील भावूक करेल हे नक्की...

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ (Dil Bechara) २४ जुलै रोजी ऑनलाईन रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वी बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांनी सुशातंला सांगितिक श्रद्धांजली वाहिली आहे. ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या टीमने विविध गायकांनी गायलेले गाणे प्रदर्शित करत सुशांतच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत.

सोनी म्युझिक इंडियाने हे गाणे युट्युबवर रिलीज केले आहे. ए.आर. रहमान यांच्यासह श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, अमिताभ भट्टाचार्य, मोहित चौहान, अरिजीत सिंह, हृदय गट्टानी आणि जोनिता गांधी यांच्या आवाजात हे गाणं आहे.  ए.आर. रहमान यांनी ट्विट करत या खास गाण्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रेमळ आठवणीत… असे कॅप्शन देत या ट्विटमध्ये हा व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

सुशांतच्या दिल बेचारा या अखेरच्या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाबड़ा यांनी केले आहे. या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तर या चित्रपटात सुशांतसह अभिनेत्री संजना संघी ही देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार असून तिचा देखील पहिलाच चित्रपट आहे.  ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या म्युझिक अल्बममध्ये अनेक गाणी गाऊन सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी देखील दिल बेचारा या कवितेचे वाचन या म्युझिक अल्बममध्ये केले आहे.

- Advertisement -

बघा व्हिडिओ


Money Heist Season 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -