घरमनोरंजनयंदाच्या ‘IFFI’ फेस्टिवलमध्ये १० मराठी चित्रपट

यंदाच्या ‘IFFI’ फेस्टिवलमध्ये १० मराठी चित्रपट

Subscribe

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'धप्पा' आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित 'आम्ही दोघी' या चित्रपटांची निवड 'फीचर फिल्म' विभागात करण्यात आली आहे.

भारतीय चित्रपट जगतात ‘इफ्फी’ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला मानाचे स्थान आहे. यंदाचं ‘इफ्फी’चं हे ४९ वं वर्ष असून, येत्या २० नोव्हेंबरला पणजी शहरात याची सुरुवात  होणार आहे.  यासाठी ‘इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म’ विभागात निवड झालेल्या चित्रपटांची यादी जाहीर झाली असून, २२ चित्रपटांपैकी २ मराठी चित्रपट आहेत. तर नाॅन फिचर फिल्म  विभागात एकूण ८ मराठी चित्रपट आहेत. ‘पॅनोरमा’ या कॅटगरीमध्ये गतवर्षाच्या तुलनेत दोन ही संख्या कमी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे गोव्यात रंगणाऱ्या या महोत्सवात मराठी चित्रपटांची पिछेहाट झाल्याचं पाहून अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘आम्ही दोघी’ या चित्रपटांची निवड ‘फीचर फिल्म’ विभागात करण्यात आली आहे. ‘धप्पा’ चित्रपटाला यावर्षीचा  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.
यंदा तामिळ,बंगाली आणि मल्ल्याळम चित्रपटांनी ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात आपलं स्थान पक्के केलं असल्याचं दिसत आहे. २२ पैकी ५ बंगाली, ४ तामिळ आणि ६ मल्ल्याळम चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ‘इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म’ विभागाच्या पहिल्या चित्रपटाची सुरूवात ही साजी करुण दिग्दर्शित ‘ओलू’ या मल्ल्याळम चित्रपटानं होणार आहे. आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘खरवस’ या मराठी चित्रपटानं ‘नॉन- फीचर फिल्म ऑफ इंडियन पॅनोरमा २०१८’ ची सुरूवात होणार आहे. याव्यतिरिक्त ‘ना बोले वो हराम’, ‘हॅप्पी बर्थडे’, ‘सायलंट स्क्रीम’, ‘येस आय एम माऊली’, ‘पॅम्प्लेट, ‘आई शप्पथ’, ‘भर दुपारी’ या चित्रपटांचीही निवड झाली आहे. यंदा ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात  लडाखी, जसरी या भाषेतील चित्रपटांनीही स्थान मिळवलं आहे. हे विशेष उल्लेखनीय आहे.  २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या काळात ‘इफ्फी’ चित्रपट महोत्सव रंगणार आहे.

वाचा: दहावीच्या परिक्षेला बसणार १२ वर्षांची मुलगी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -