घरमनोरंजनती अ‍ॅण्ड ती आणि ते

ती अ‍ॅण्ड ती आणि ते

Subscribe

पुष्कर जोगने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. हिंदी चित्रपटांचाही त्याने दरवाजा ठोठावला आहे. अभिनेता म्हणून परिचयाचा असलेल्या पुष्करने निर्माता म्हणूनही आपला वेगळा प्रवास सुरू केला आहे. ती अ‍ॅण्ड ती आणि ते यात त्याने दोन जबाबदार्‍या स्वीकारल्या आहेत. एक म्हणजे तो अभिनेता म्हणून दिसणार आहे आणि दुसरं म्हणजे वैषल शहा आणि मोहन नदार यांच्याबरोबर पुष्करनेही चित्रपटाची निर्मिती केली आहे. ती अ‍ॅण्ड ती हे या चित्रपटाचे नाव आहे. त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मृणाल कुलकर्णीवर सोपवलेली आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे.

सध्या सर्व कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेले आहेत. सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत पुष्करही सध्या फिरतो आहे. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमचा चित्रपट कसा वेगळा हे दिलखुलास गप्पांतून सांगितले. बालपणीची मैत्रिण, मित्र विवाहबद्ध झाल्यानंतर जेव्हा अनेक वर्षांनंतर भेटतात तेव्हा पती-पत्नी आणि मैत्रिण यांच्यात ज्या अनेक गमती-जमती, भावनिक गोष्टी घडतात, त्याचे दर्शन या चित्रपटात पहायला मिळणार आहे. विराजस कुलकर्णी याची ही कथा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -