घरमनोरंजनUrfi Javed: उर्फीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, उर्फीचा आतापर्यंतचा सर्वाधिक हॉट व्हिडीओ...

Urfi Javed: उर्फीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, उर्फीचा आतापर्यंतचा सर्वाधिक हॉट व्हिडीओ चर्चेत

Subscribe

आपल्या विचित्र स्टाईलमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेदने आणखी एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र यंदा उर्फीने पोस्ट केलेल्या या बोल्ड व्हिडिओमुळे सोशल मीडियाचा पार हाय झाला आहे. बिग बॉस ओटीटी या रियालिटी शोच्या माध्यमातून चर्चेच्या केंद्र स्थानी असलेली उर्फी जावेद तिच्या हटके स्टायलिश कपड्यांमुळे व्हायरल होत असते. नुकतचं उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण बॅकलेस अंदाजात दिसतेय. मात्र एकीकडे उर्फीचा हा बोल्ड अवतार पाहून नेटकरी फिदा झाले आहेत तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केलीये.

उर्फी जावेद नेहमी तिच्या चित्र-विचित्र फॅशन सेन्समुळे सर्वांना चकीत करते. नुकतचं तिने तिच्या सोशल मीडिया अकांऊटवर एक व्हिडिओ शेअर केलाय यामध्ये तीने संपूर्ण बॅकलेस कपडे परिधान केले आहे. मात्र पाठमोऱ्या अंदाजात चालत असताना उर्फी संपूर्ण टॉपलेस असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या मात्र जेव्हा उर्फीने पलटी मारली तेव्हा तिने निळ्या रंगाचा स्ट्रॅप्लेस ब्रालेट घातली असल्याचे दिसतेय. यासह तिने त्याच रंगाचा साईड स्लिट स्कर्ट घातला आहे. उर्फीने हा व्हिडिओ पोस्ट करताच अल्पवधीतच याला लाखो व्ह्यूव आणि कमेंट मिळाल्या आहेत.मात्र काही नेटकऱ्यांची उर्फीचा हा व्हिडिओ पाहून काहीश्या प्रमाणात निराशा झाल्याचे दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

- Advertisement -

उर्फी जावेदच्या वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास उर्फी बिग बॉस ओटीटीमधून चर्चेत आली आणि त्यानंतर ती हळूहळू इंटरनेट सेन्सेशन बनली. बिग बॉसमधून ती अवघ्या एका आठवड्यात बाहेर पडली असली तरी एका आठवड्यात तिने मिळवलेली प्रसिद्धी आज सर्वांसमोर आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो तसेच रील आणि व्हिडिओ शेअर करत असते.

- Advertisement -

हे हि वाचा –  जान्हवीच्या पावलावर पाऊल ठेवत बहीण खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -