‘यश राज’ बॅनरची आगामी कलाकृती ‘सुई धागा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुढील शुक्रवारी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शीत होणार असून सध्या विविध मार्गाने या चित्रपटाचे प्रमोशन केले जात आहे. नुकताच वरुण धवनने ‘सुई धागा चॅलेंज’ हा खेळ सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला असून संपूर्ण देशाला या खेळात सहभागी हेण्याचे आवाहन त्याने केले आहे.
करण-रणबीरने घेतल सुई धागा चॅलेंज
Thanks for nominating us @aliaa08 ! We accept the #suidhaagachallenge and further nominate @deepikapadukone and @RanveerOfficial !! Best of luck @AnushkaSharma @Varun_dvn pic.twitter.com/B0SaafYSji
— Karan Johar (@karanjohar) September 19, 2018
काय आहे ‘सुई धागा चॅलेंज’
अभिनेता वरुण धवनने बॉलीवूडमधील त्याचे सहकलाकार आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांचा हे ‘सुई धागा चॅलेंज’ दिले. यामध्ये अवघ्या १० सेकंदाच दोनही कलाकारांना सुईमध्ये धागा ओवून दाखवयाचे होते. या खेळात आलियाने बाजी मारली असून शेवटच्या सेकंदाला तिने सुईत धागा ओवला आहे. हा खेळ व्हायरल व्हावा यासाठी त्यांनी हे चॅलेंज इतर सेलिब्रिटींनाही दिले आहे. आलिया भट्ट हिने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला तर आदित्यने वरुणचा भाऊ रोहीत धवनला हे चॅलेंज दिले आहे. तर भारतातील सर्वाधीक लोकांनी चॅलेंज घ्यावे, असे वरुणने व्हिडिओच्या अंती म्हटले आहे. हा व्हिडिओ वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
‘हम फिट तो इंडिया फिट’ चॅलेंज
जगभरातून विविध चॅलेंजेस सेलिब्रिटी आणि कलाकार मंडळी देत असतात. यापूर्वीही आईस बकेट चॅलेंज, किकि चॅलेंज यांचे व्हायरल व्हिडिओ आपण पाहिले आहेत. काही महिन्यांपूर्वी केंद्रमंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही ‘हम फिट तो इंडिया फिट’ हे चॅलेंज बॉलीवूड कलाकार, खेळाडू आणि राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांना दिले होते. त्यालाही सर्व सेलिब्रिटींनी चांगला प्रतिसाद दिला होता.