घरमनोरंजनविकी कौशल पुन्हा पडला प्रेमात; 'या' अभिनेत्रीने केले कन्फर्म

विकी कौशल पुन्हा पडला प्रेमात; ‘या’ अभिनेत्रीने केले कन्फर्म

Subscribe

ब्रेक अपनंतर विकी पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये

हरलीन सेठीसोबत झालेल्या ब्रेक अपनंतर विकी पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा अभिनेत्री राधिका आपटे हिने केला आहे. हरलीन सेठीच्या ब्रेकअपच्या चर्चेनंतर अभिनेता विकी कौशल ‘बियॉन्ड द क्लाउड्स’च्या अभिनेत्री मालविका मोहननला डेट करत असल्याच्या चर्च्यांना उधाण आले आहे. नुकतेच अभिनेत्री राधिका आपटेनेही कन्फर्म केले आहे की, विक्की पुन्हा एकदा प्रेमात बुडाला आहे. मात्र राधिकाने त्या मुलीचे नाव सांगितले नाही.

- Advertisement -

नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये नुकतीच राधिका आपटे उपस्थित होती. त्यावेळी तिला बॉलिवूडमधील कलाकारांच्या अफेअरविषयी विचारण्यात आले. ‘बॉलिवूडमध्ये अशी कोणती जोडी आहे ज्या जोडीने आपल्या नात्याची ऑफिशिअल घोषणा करावी असे वाटते?’ असा प्रश्न नेहाने तिला विचारला. यावेळी राधिकाने वेळ घेत विकी कौशलचे नाव घेतले. विक्की बद्दल बोलताना राधिका असे ही म्हणाली की, ‘विकी कौशल सध्या एका चांगल्या मुलीला डेट करतोय. विक्कीही खूप चांगला आहे आणि ती मुलगीही. त्यामुळे या दोघांनी आता आपले नाते जाहीर करावे’

यावेळी राधिकाने ती मुलगी कोण हे मात्र सांगितले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. परंतु, विकी आणि मालविका बालपणीचे मित्र आहेत. इतकेच नव्हे तर मालविका विकीला राखी बांधते असे आता स्पष्ट करण्यात आले आहे. हरलीन सेठीसोबत झालेल्या ब्रेक अपनंतर विकी अभिनेत्री कटरिना कैफला डेट करत असल्याची चर्चा सध्या बॉलिवूड विश्वात सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -