घरमनोरंजनविकी कौशल करणार 'या' तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम?

विकी कौशल करणार ‘या’ तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम?

Subscribe

विकी कौशलला तमिळ चित्रपट 'वीरम' च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्याबाबत विचारणा करण्यात आली

अभिनेता विकी कौशलने आपल्या दमदार अभिनय शैलीच्या माध्यमातून बॉलिवूड जगात आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असणारी ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात काम करूम अनेकांचा लाडका अभिनेता ठरला. यावर्षातला हा पहिला सुपरहिट चित्रपट विकी कौशलचा ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर विकी आपल्या काही आगामी चित्रपटामध्ये काम करत आहे.

View this post on Instagram

Heads up. Suit up. Let’s go for a take! ?

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

- Advertisement -

नुकतेच विकी कौशलला तमिळ चित्रपट ‘वीरम’ च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. या हिंदी रिमेक चित्रपटाचे नाव ‘लॅड ऑफ लुंगी’ असेल, असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाला साजिद नाडियाडवाला प्रोड्यूस करणार असून फरहद सामजी दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाकरिता अक्षय कुमारला देखील विचारण्यात आले होते, मात्र त्याच्याकडे डेट्स नसल्याकारणाने अक्षय या चित्रपटात काम करू शकणार नाही. मात्र यावेळी अक्षयने विकी कुमारचे नाव सुचवल्याचे समजते आहे.

- Advertisement -

काही सुत्रांच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, विकी यापुर्वी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना भेटला होता आणि या चित्रपटाच्या कथेबद्दल आपली पसंती दर्शवली होती. मात्र त्यांच्याकडे असणाऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र आहे. शहीद ऊधम सिंह यांचा बायोपिक तसेच करण जोहरची मल्टी-स्टारर फिल्म ‘तख्त’ शिवाय विकी कौशल एका हॉरर चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -