घरमुंबईविधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हानिहाय बैठका

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जिल्हानिहाय बैठका

Subscribe

बैठकीमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीचे निकाल, राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती, दुष्काळ आणि इतर प्रश्न, त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आता सर्वच पक्ष लागले आहेत. निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठकींचे आयोजन केले होते. मुंबईतल्या टिळक भवन येथे ही बैठक पार पडली. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकींना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, हुसेन दलवाई, आमदार शरद रणपिसे, अमित देशमुख, राजीव सातव, भाई जगताप, सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

काँग्रेसच्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीचे निकाल, राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती, दुष्काळ आणि इतर प्रश्न, त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या बैठकींसाठी जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांशी चर्चा सुरू करण्यापूर्वी काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी या बैठकींचे आयोजन केल्याचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – 

काँग्रेसच्या बैठकांवर बैठका; आता घेणार मतदारसंघांचा आढावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -