Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन विकी कौशल बनला 'भजनकुमार'

विकी कौशल बनला ‘भजनकुमार’

Subscribe

विकी कौशलच्या या चित्रपटाचं नाव "द ग्रेट इंडियन फॅमिली"(The Great Indian Family) असं आहे. या चित्रपटात मानुषी छिल्लर दिसणार आहे. त्यामुळे मानुषीचा अभिनय सुद्धा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

विकी कौशलचा धमाकेदार अभिनय आणि त्याचं व्यक्तिमत्व यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो.सध्या त्याच्या नव्या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.या चित्रपटात विकीने एका भारतीय कुटुंबातील तरुण मुलाची भूमिका निभावली आहे. त्याचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे.ट्रेलरमधील त्याच्या अभिनयाबद्दल अनेक प्रतिक्रिया तर आल्या आहेतच पण या चित्रपटातील गाणं ‘कन्हैया ट्विटर पे आजा ‘हे सध्या जास्त चर्चेत असताना दिसत आहे. यामध्ये विकी कौशलचा भन्नाट डान्स सुद्धा पाहायला मिळत आहे.

हे ही पाहा‘बिग बॉस’ नंतरची ‘दिल दोस्ती दिवानगी’

- Advertisement -

विकी कौशलच्या या चित्रपटाचं नाव “द ग्रेट इंडियन फॅमिली”(The Great Indian Family) असं आहे. या चित्रपटात मानुषी छिल्लर दिसणार आहे. त्यामुळे मानुषीचा अभिनय सुद्धा पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत .याआधी मानुषीने अक्षय कुमारसोबत सम्राट पृथ्वीराज या चित्रपटात अभिनय केला आहे.या चित्रपटातील तिची भूमिका सुद्धा वेगळी होती.अभिनयासोबतच यामध्ये मानुषीच्या नृत्याने विशेष लक्ष केंद्रित केले होते. या चित्रपटात सुद्धा याच पद्धतीची अनेक भन्नाट गाणी असतील असे दिसून येत आहे.

विकी कौशल आणि मानुषीच्या या नव्या चित्रपटातील ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ हे गाणं गोकुळ अष्टमीच्या आधी रिलीज झालं आहे त्यामुळे निश्चितच या गाण्याला प्रचंड पसंती मिळणार असे चित्र दिसत आहे.विकीने याआधी सुद्धा अनेक चित्रपटात उत्तम अभिनय करून अनेकांची मन जिंकली आहेत. जरा हटके जरा बचके या चित्रपटानंतर लगेचच विकीचा हा नवा चित्रपट पाहायला मिळणार आहे. उरी या चित्रपटामुळे विकी कौशल सर्वात जास्त चर्चेत आला होता.
हा चित्रपट भारतीय कुटुंबावर आधारित आहे.त्यामुळे लोकांची पसंती मिळेल असे दिसत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -