घर उत्तर महाराष्ट्र कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत 9 लाखांचा गंडा

कुरिअरमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत 9 लाखांचा गंडा

Subscribe

नाशिक : कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगत पोलिसात गुन्हा दाखल न करण्यासाठी संशयिताने ऑनलाईन एका युवकाला ९ लाखांना गंडविले. तर, घरबसल्या कामातून पैसे कमविण्याचे आमिष दाखवून दोन घटनांमध्ये सायबर भामट्यांनी सुमारे पाच लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी नाशिक सायबर पोलीसा ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व मंजिरी सतीश पाटणकर (रा. पाईपलाइन रोड, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या १५ मे रोजी सायबर भामट्याने फोनवरून संपर्क साधत कुरीअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावे पार्सल आले असून त्यात ड्रग्ज सापडले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात असल्याची भिती सायबर भामट्याने ५४ वर्षीय मंजिरी यांना दाखवली. तसेच वेगवेगळ्या लोकसेवकांची नावे सांगून आणि पोलीस बोलत असल्याचे भासवून मंजिरी यांच्यावर दबाव टाकून त्यांना गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पैशांची मागणी केली. त्या भितीपोटी मंजिरी यांनी भामट्यास ऑनलाईन ९ लाख १ हजार ९५० रुपये पाठविले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंजिरी यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -

विनय राजेंद्र पाटील ( रा. आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सायबर भामट्याने त्यांना गेल्या २७ ते ३१ मे दरम्यान पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने मोबाईलवरून संपर्क साधला होता. टेलिग्रामवरचा जॉब असल्याचे भासविले. केलेल्या कामाचा मोबदल्यासाठी संशयिताने त्याने वेगवेगळ्या खात्यावर दरम्यान २ लाख ३२ हजार ८६ हजार रुपये भरण्यास भाग पाडून गंडा घातला. दुसर्‍या घटनेत, आबेदेन हकीमुद्दीन सैफिन यांच्या फिर्यादीनुसार, सायबर भामट्याने २७ ते २९ जून दरम्यान वर्क फ्रॉम होममार्फत पैसे कमवण्याचे आमिष दाखविले. मात्र, त्यापोटी भामट्याने आबेदेन यांच्याकडून २ लाख ४० हजार रुपये घेत गंडा घातला. या तीनही गुन्ह्यांचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -