घरमनोरंजनविजय देवरकोंडा आणि समंथा प्रभु लवकरंच झळकणार नव्या चित्रपटात

विजय देवरकोंडा आणि समंथा प्रभु लवकरंच झळकणार नव्या चित्रपटात

Subscribe

२१ एप्रिल रोजी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल. त्याबरोबरचं हैदराबादमध्ये या चित्रपटाच्या मुहूर्ताचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला जाईल. हा चित्रपट एक रोमाँटिक ड्रामा असेल, ज्याची शूटिंग काही काळानंतर काश्मीरमध्ये सुरू केले जाईल.

टॉलिवूडचे सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि समंथा प्रभु आता लवकरंच एका नव्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या  चित्रपटाच्या दिग्दर्शक शिुव यांनी, या चित्रपटामध्ये या दोघांच्या जोडीला मुख्य भूमिकेसाठी कास्ट केलेलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार २१ एप्रिल रोजी या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल. त्याबरोबरचं हैदराबादमध्ये या चित्रपटाच्या मुहूर्ताचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला जाईल. हा चित्रपट एक रोमाँटिक ड्रामा असेल, ज्याचे शूटिंग काही काळानंतर काश्मीरमध्ये सुरू केले जाईल.

सूत्रांच्या माहितीनुसार , काश्मीरमध्ये विजय आणि समंथासोबतचे काही सीन्सचे शुटिंग केले जातील. या चित्रपटाबाबत असं सांगितलं जात आहे की, यात दाखवली जाणारी लव स्टोरी पृष्ठभूमी सेनेवर आधारित असेल. मात्र, अजूनही संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. विजय या चित्रपटात आर्मीमॅन च्या भूमिकेत दिसूण येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

याशिवाय विजय देवरकोंडा आता लवकरंच बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. ‘लाइगर’ हा त्याचा हिंदी आगामी चित्रपट लवकरंच या वर्षी डिसेंबर पर्यंत रिलीज होणार आहे. या चित्रपटात तो अनन्या पांडे सोबत मुख्य भूमिकेत दिसूण येईल.

तसेच समंथा प्रभु याआधी ‘फॅमिली मॅन २’ या वेब सिरीजमध्ये दिसूण आली होती, यातील राजी या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. शिवाय ‘पुष्पा’ या बहुचर्चित चित्रपटातील समंथा एका आइटम सॉंग मध्ये दिसून आली होती. तिचं हे आइटम साँग जबरदस्त हिट झालं. याशिवाय समंथा आता लवकरंच तिच्या ‘काथु वाकुला रेंदु काधल’ या आगामी चित्रपटात दिसूण येईल. समंथा आता ‘शकुंतलम’ आणि ‘यशोदा’ या दोन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

- Advertisement -

 

Gutkha ad: गुटख्याच्या जाहिरातीने अक्षय कुमार झाला ट्रोल, माफीनामाही सादर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -