घरमनोरंजनYusuf Hussain :'विवाह,रईस, ते धूम'पर्यंत अभिनयाची जादू दाखवणारे अभिनेते युसुफ हुसेन काळाच्या...

Yusuf Hussain :’विवाह,रईस, ते धूम’पर्यंत अभिनयाची जादू दाखवणारे अभिनेते युसुफ हुसेन काळाच्या पडद्याआड

Subscribe

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते युसुफ हुसेन यांच निधन झालं आहे. निर्माते आणि युसुफ यांचे जावई हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन युसुफ हुसेन यांच्या दु:ख निधनाची माहिती दिली आहे. युसुफ हुसेन यांनी आजवर रईस, धूम २, दिल चाहता है, ओह माय गॉड, विवाह, राज, हजारों ख्वाइशे ऐसी, शाहिद, क्रिश ३, दबंग ३, द ताश्कंद फाइल्स, जलेबी, खोया खोया चांद, क्रेजी कुक्कड फॅमिली, रोड टू संगम अशा अनेक बॉलिवूड सिनेमांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. तर टेलिव्हिजनवरील सीआयडी, तुम बिन जाऊ कहां, कुमकुम : एक प्यारा सा बंधन, श्श्शू… कोई है, मुल्ला नसरुद्दीन सारख्या मालिकांमधून दर्जेदार भूमिका केल्या आहेत. अभिनेते युसुफ हुसेन यांच्या अचानक एक्झिटमुळे आता बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकारांना सोशल मीडियावर पोस्ट करत युसुफ हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -

हंसल मेहता यांनी पोस्ट करत लिहिले की, मी शाहिदचे २ शेड्युल पूर्ण केले होते मात्र काही कारणामुळे मी अडचणीत सापडलो होतो. यावेळी माझे चित्रपट निर्माता म्हणून माझी कारकीर्द संपणार होती. यावेळी युसूफ हुसेन यांनी मला त्रास होऊ नये यासाठी त्यांच्याकडील फिक्स डिपॉझिटची रक्कम दिली, त्यांनी चेकवर सही केली त्यानंतर शाहिद पूर्ण झाला. असे होते युसूफ हुसेन. ते माझ्या वडिलांसारखे होते. जीवन जिवंत असते तर कदाचित त्यांच्या रूपात असते.

हंसल यांनी पुढे लिहिले की, युसूफ सरांमुळे नवीन आयुष्य जगलो, मी तुमचा ऋणी आहे. खरंच आज मी अनाथ झालो. आता आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. मला तुमची खूप आठवण येईल. माझी उर्दू खराबच राहील आणि हो – लव्ह यू लव्ह यू लव्ह यू.’

- Advertisement -


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -