घरमनोरंजनमराठीतला पहिला वेब सिनेमा 'संतुर्की'

मराठीतला पहिला वेब सिनेमा ‘संतुर्की’

Subscribe

गावा-शहरांपासून अगदी सातासमुद्रापार या वेबसिरीजची चर्चा झाली.

सेलिब्रिटी कलाकार जोड्यांच्या आयुष्यात काय घडते हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकतेचे वातावरण बघायला मिळते. बॉलिवूड विश्वात ‘दीपवीर’, ‘विरुष्का’ अशा जोड्या नेहमी चर्चत असतात. अशा जोड्यांमध्ये मराठीतील एक जोडी सध्या मोठी चर्चेत आहे. ती जोडी म्हणजे ‘संत्या’ आणि ‘सुरकी’ची अर्थात ‘संतुर्की’.

‘कोरी पाटी प्रोडक्शन’च्या ‘गावाकडच्या गोष्टी’मधील लोकप्रिय जोडी ‘संत्या-सुरकी’ यांची प्रेमकथा आता ‘संतुर्की’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी पोहचलेली सुप्रसिद्ध मराठी वेबसिरीज ‘गावाकडच्या गोष्टी’ वेगळ्या वळणावर पोहचून एक नवं वळण घेतलं आहे. या वेबसिरीजचे दोन पर्व जरी संपले असले तरी हा पूर्णविराम मिळालेला नाही. कोरी पाटी प्रोडक्शनच्या गावाकडच्या गोष्टीमधील लोकप्रिय जोडी “संत्या-सुरकी” यांची प्रेमकथा आपल्याला नितीन पवार दिग्दर्शित “संतुर्की” या वेबसिनेमाद्वारे प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

- Advertisement -

संतुर्की या वेबसिनेमाचा पहिला टीझर व्हॅलेंटाईन डे च्या प्रदर्शित करण्यात आला होता तर, नुकताच वेबसिनेमाचा ट्रेलर कोरी पाटी प्रोडक्शन्स या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. गावा-शहरांपासून अगदी सातासमुद्रापार या वेबसिरीजची चर्चा झाली.

- Advertisement -

सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या वेबसिरीजला जगभरातून प्रेम मिळाले. या वेबसिरीजमध्ये “संत्या आणि सुरकी” हे पात्र सर्वाधिक प्रेक्षकांचे लोकप्रिय आणि आपलेसे झाले आहे. एकमेकांवर जिवापाड प्रेम असूनही येणाऱ्या अडचणी, ‘सुरकी’चं दूर जाणं आणि त्यानंतर पुन्हा ‘संत्या’च्या समोर येणं या साऱ्यात विरह, तगमग आणि बऱ्याच अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं ‘संतुर्की’मधून मिळणार आहेत. या वेब चित्रपटाच्या निमित्ताने संतोष राजेमहाडीक, रश्मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार असून के.टी.पवार, तृप्ती शेडगे, शुभम काळोलिकर,समाधान पिंपळें हे कलाकार देखील यात झळकणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -