घरदेश-विदेशमोदी २.० मध्ये निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्रालय; तर अरविंद सावंतांना अवजड उद्योग...

मोदी २.० मध्ये निर्मला सीतारामन यांना अर्थमंत्रालय; तर अरविंद सावंतांना अवजड उद्योग मंत्रालय

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा देशाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या सरकारमधील मंत्रीमंडळात कोणत्या नेत्याची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर त्यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांची नावं काल, गुरुवारी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात समजली. मात्र कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते असणार यावरील चर्चा सुरु राहिल्या. या संदर्भातील एक यादी जाहीर झाली असून यामध्ये काही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार भाजप अध्यक्ष राहिलेले नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांना मंत्रीमंडळात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. अमित शहा यांना गृह मंत्रालय देण्यात आले आहे. तर राजनाथ सिंग यांना संरक्षण मंत्रालय दिले आहे. तसेच निर्मला सीतारमन यांना अर्थ मंत्रालय देण्यात आलं आहे. शिवाय मुंबई खासदार अरविंद सावंत पहिल्यांदा केंद्रात मंत्रीमंडळात सामील झाले असून त्यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात दुसऱ्यांना स्थापन झालेल्या भाजपा सरकारमध्ये कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र त्यात फारसे काही बदल न करता मागील सरकारमधील मंत्री आणि त्यांच्या जबाबदाऱ्या कायम ठेवण्यात आल्या आहेत.

ही आहेत मंत्र्यांना मिळालेली खाती – 

  • नरेंद्र मोदी : पंतप्रधान
  • अमित शहा : गृहमंत्रालय
  • निर्मला सीतारमन : अर्थ आणि कॉर्पोरेट कार्य मंत्रालय
  • नितीन गडकरी : भूपृष्ठ वाहतूक, नौवहन, जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनर्विकास
  • सुब्रमण्यम जयशंकर : परराष्ट्र मंत्री
  • राजनाथ सिंग : संरक्षण मंत्रालय
  • रामविलास पासवान : अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • रवी शंकर प्रसाद : कायदा आणि सामाजिक न्याय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान
  • डी. व्ही. सदानंद गोवडा : रसायने व खते, संसदीय कामकाज
  • स्मृती इराणी : महिला-बालकल्याण
  • डॉ. हर्ष वर्धन : आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान
  • पियुष गोयल : रेल्वे
  • रमेश पोखरियाल : निशंक मनुष्यबळ विकास
  • किरेन रिजीजू : क्रीडा
  • प्रकाश जावडेकर : माहिती व प्रसारण
  • थावरचंद गेहलोत : सामाजिक न्याय
  • नरेंद्रसिंह तोमर : कृषिमंत्री
  • प्रल्हाद जोशी : संसदीय कामकाज व खाण
  • अर्जुन मुंडा : आदिवासी विकास
  • मुख्तार अब्बास : नक्वी अल्पसंख्याक
  • महेंद्र नाथ पांडे : कौशल्य विकास – महेंद्र नाथ पांडे
  • हरसिमरत कौर : बादल अन्न प्रक्रिया उद्योग
  • अरविंद सावंत : अवजड उद्योग
  • गजेंद्र सिंग शेखावत : पेयजल व सांडपाणी
  • गिरीराज सिंग : पशूसंवर्धन, मस्त्योद्योग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -