घरमनोरंजनलाडूच्या बाळकृष्ण लीला बघा सोमवारच्या भागात!

लाडूच्या बाळकृष्ण लीला बघा सोमवारच्या भागात!

Subscribe

राणा आणि अंजली यांच्या आयुष्यात आलेला राजवीर हा त्यांच्यासाठी खूप खास आहे आणि घरातला लाडका देखील आहे. गोकूळ अष्टमीच्या दिवशी हा लाडू बाळकृष्णाच्या रुपात दिसणार आहे आणि तो दहीहंडीही फोडणार आहे. या दिवशी 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत गोकुळाष्टमीचा खास उत्सव दिसून येणार आहे.

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय झाली आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. निरागस राणादा आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असणाऱ्या पाठकबाईंवर प्रेक्षकांनी प्रेम केलंच, पण लाडूच्या निमित्ताने आलेल्या नवीन गोड पात्रालाही स्विकारलं.

त्यामागे कारणही तसंच होतं. छोट्याशा लाडूने मालिकेतील पात्रांबरोबरच प्रेक्षकांनाही आपल्या गोड बोलण्याने आपलंसं केलं. राणा आणि अंजली यांच्या आयुष्यात आलेला राजवीर हा त्यांच्यासाठी खूप खास आहे आणि घरातला लाडका देखील आहे. गोकूळ अष्टमीच्या दिवशी हा लाडू बाळकृष्णाच्या रुपात दिसणार आहे आणि तो दहीहंडीही फोडणार आहे. या दिवशी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत गोकुळाष्टमीचा खास उत्सव दिसून येणार आहे.

- Advertisement -
Tuzyat jiv rangla
लाडूच्या कृष्णलीला

राणादाचा लाडोबा बाळकृष्णासारखाच लाघवी आणि खोडकर आहे. गोकुळाष्टमीच्या उत्सवात वाड्यावर खास भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. घरातील संपूर्ण वातावरण भजनाच्या गजरात भक्तिमय होणार आहे. राणा आणि अंजली श्रीकृष्णाच्या पूजेची जय्यत तयारी करत आहेत. गोकुळाष्टमी हा सण गायकवाडांच्या वाड्यात अत्यंत जोशात आणि आनंदात साजरा होणार आहे. त्यामुळे आता हा खोडकर लाडू दहीहंडी कशी फोडणार? हे प्रेक्षकांना सोमवारच्या भागात बघता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -