घरमनोरंजन'हृदयात समथिंग समथिंग' सिनेमाचा रिफ्रेशिंग टीझर!

‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचा रिफ्रेशिंग टीझर!

Subscribe

प्रविण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा टीझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे. चित्रपट 5 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. मराठीतील विनोदवीर अशोक सराफ या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहेत.

‘हृदयात समथिंग समथिंग’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रोमँटिक कथानक असलेल्या या चित्रपटात अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खऱ्या आयुष्यात नुकताच साखरपुडा केलेलं हे कपल आता पडद्यावरही रोमान्स करताना दिसणार आहेत. प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचा टीझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे. चित्रपट 5 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भूषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या रिफ्रेशिंग टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तीला इम्प्रेस करताना प्रेमवीरांची कधी-कधी त्रेधातिरपिट उडते. या त्रेधातिरपिटीमधल्याच गंमतीजंमती हृदयात समथिंग समथिंग या सिनेमात तुम्हांला पाहायला मिळतील.

प्रविण राजा कारळे, दिग्दर्शक

- Advertisement -

‘हृदयात समथिंग समथिंग‘चं विशेष आकर्षण ठरतायत सर्वांचे लाडके ‘अशोक मामा’ अर्थात अभिनेते अशोक सराफ. मराठीतील विनोदवीर अशोक सराफ या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहेत. गेली अनेक वर्षे प्रेक्षकांना हसवणारे अशोक मामा या चित्रपटात ‘लव्हगुरू’च्या भूमिकेत दिसणार आहेत!

 

आयुष्यात कधीही प्रेमात न पडलेला माणूसच विरळा. त्यामूळे प्रत्येकाला प्रेमात पडल्यानंतर या सिनेमात होणाऱ्या गंमती-जंमती कधीतरी आपल्याही बाबतीत घडल्या आहेत असे वाटेल. ही तुमच्या-आमच्या सर्वांच्या ‘हृदया’जवळची कथा आहे!

अशोक सराफ, अभिनेते

- Advertisement -

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. लवकरच हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. पण लग्नाच्याआधी एकत्र बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘हृदयात समथिंग समथिंग’ या मराठी सिनेमातून हे दोघे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

अशोकमामांनी आपल्या सर्वांच्या हृदयात गेली कित्येक वर्ष राज्य केले आहे. आणि आता या मॅड-कॉमेडी सिनेमातून पुन्हा एकदा त्यांचं धमाल कॉमिक टायमिंग आपल्याला अनुभवता येईल. हा कौटुंबिक मनोरंजक सिनेमा तुम्हाला पोटभर हसवेल, असा मला विश्वास वाटतो.

अनिकेत विश्वासराव, अभिनेता

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -