घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार 27 नोव्हेंबर 2023

राशीभविष्य : सोमवार 27 नोव्हेंबर 2023

Subscribe

मेष : किरकोळ कारणाने तुमचे काम अडचणीत येऊ शकते. जिद्द ठेवा. प्रयत्नाने पुढे जाता येईल.

वृषभ : महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. कोर्ट केस यशस्वी कराल. नवीन ओळखी होतील. स्पर्धेत प्रगती कराल.

- Advertisement -

मिथुन : कोर्टाच्या कामात यश मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या जाळ्यात फसू नका. पैसा फुकट जाईल. स्पर्धा जिंकाल.

कर्क : धंद्यात फायद्याचे काम मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात विशेष पराक्रम दिसेल. उत्साह वाढेल.

- Advertisement -

सिंह : अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. प्रवासात अडचण येईल. गुप्त शत्रू कारस्थाने करतील, टीका होईल.

कन्या : महत्त्वाच्या कामात आळस करू नका. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. नोकरीत तुमचे कर्तृत्व दिसेल. मित्र भेटतील.

तुळा : कठीण प्रसंगावर मात करावी लागेल. संताप केल्यास मार्ग शोधणे कठीण होईल. व्यवहारात सावध रहा.

वृश्चिक : तुम्ही ठरविलेले काम वेळेत पूर्ण कराल. नवा विषय शिकाल. कला क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. प्रतिष्ठा मिळेल.

धनु : इतरांसाठी धडपड करावी लागेल. तुम्ही उदास व्हाल. राग वाढेल. खर्च करावा लागेल. प्रवास कराल.

मकर : घरातील तणाव कमी करता येईल. नवीन खरेदी कराल. धंद्यातील प्रश्न सोडवता येईल. केस जिंकाल.

कुंभ : तुमचे बोलणे कठोर वाटेल. वादग्रस्त ठरेल. जवळचे लोक नाराज होतील. पोटाची काळजी घ्या.

मीन : आजचे काम उद्यावर टाकू नका. धंद्यात घेतलेले कष्ट उपयुक्त ठरतील. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -