घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार २८ नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : मंगळवार २८ नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष :- खंबीर राहा; पण दादागिरी करू नका. तुमच्या कामात मदत घेता येईल. धंद्यात वाद होईल. प्रवासात घाई करू नका.

वृषभ :- कठीण वाटणारे काम करून घ्या. घरातील व्यक्तींच्या सुखासाठी प्रयत्न कराल. नोकरीत प्रगती कराल.

- Advertisement -

मिथुन :- प्रवासात नवीन ओळख होईल. धंद्यात वाढ करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात दिशादर्शक मार्गदर्शन मिळेल.

कर्क :- कलाक्षेत्रात मन रमेल. प्रेरणादायी घटना घडेल. आत्मविश्वासाने कठीण काम करून दाखवाल.

- Advertisement -

सिंह :- राजकीय क्षेत्रात तुमच्यावर दबाव तंत्राचा वापर केला जाईल. कोंडीत अडकाल. जवळच्या लोकांचे सहाय्य मिळेल.

कन्या :- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जुने स्नेही भेटतील. मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

तूळ :- रागावर ताबा ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा. स्पर्धा वाढेल.

वृश्चिक :- तुमच्या वागण्या-बोलण्याचा प्रभाव पडेल. परिचयात वाढ होईल. स्पर्धा जिंकाल. खरेदी कराल.

धनु :- शारीरिक, मानसिक तणाव नकोसा वाटेल. शेजारी तुम्हाला स्वतःच्या समस्या सांगेल. वस्तू नीट सांभाळा.

मकर :- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. प्रेमाला चालना मिळेल. कायद्यासंबंधी योग्य ती चर्चा करता येईल.

कुंभ :- विरोधकांना शह देताना राग आवरावा लागेल. तसेच तुमचा प्रभाव अधिक पडेल. नवे शिकाल.

मीन :- मुलांच्या संबंधी समस्या सोडवाल. घर, वाहन घेण्याचे ठरवाल. धंद्यात वाढ होईल. जुने येणे वसूल करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -