घरलाईफस्टाईलमुलांना ब्रेसेस लावण्यापूर्वी

मुलांना ब्रेसेस लावण्यापूर्वी

Subscribe

तुमच्या मुलांचे दात वाकडेतिकडे असतील किंवा एखादा दात अर्धवट तुटलेला तुम्हाला दिसला की सर्वात प्रथम तुमच्या मनात मुलांना ब्रेसेस लावण्याचा विचार येतो.जर यासाठी तुम्ही डेंटिस्टकडे जाणार असाल तर त्याआधी तुम्हाला ब्रेसेसचे प्रकार माहीत असणे गरजेचे आहे.जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर...

ब्रेसेस लावण्याचे योग्य वय
मुलांच्या दातांना ब्रेसेस लावण्यासाठी १२ ते १३ वर्षे हे योग्य वय आहे. मात्र काही वेळा मुलांच्या दातांच्या रचनेनुसार ब्रेसेस लावण्यापूर्वीही काही उपचार पद्धती कराव्या लागतात. अशावेळी मुलांना ९ ते १० व्या वर्षीही ब्रेसेस लावण्यात येतात. यामुळे त्यांच्या ब्रेसेस लावून ठेवण्याच्या कालावधीतही बदल होऊ शकतो. वाढत्या वयातील मुलांमध्ये ब्रेसेस लावणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे अशावेळी मुलांच्या दातांतील एखाद्या समस्येवर डेंटिस्ट लहान वयातही ब्रेसेस लावण्याचा सल्ला देतात.

ब्रेसेसचे प्रकार
बाजारामध्ये तीन मुख्य प्रकारच्या ब्रेसेस उपलब्ध आहेत.

- Advertisement -

मेटल ब्रेसेस
ही एक धातूपासून तयार केलेली ब्रेसेस आहे. सामान्यत: मेटल ब्रेसेस मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मुलांना या ब्रेसेसला कमीतकमी एक ते दीड वर्षे लावावे लागते.

सिरॅमिक ब्रेसेस
या ब्रेसेस आकाराने मेटल ब्रेसेस प्रमाणेच असतात.फक्त त्यांचा रंग सफेद किंवा ट्रान्सपरंट असतो जो दातांच्या रंगात सहज मिसळतो. या ब्रेसेस लावण्याचा कालावधी एक ते दोन वर्षे असतो.मेटल ब्रेसेस प्रमाणेच सिरॅमिक ब्रेसेस ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण कालावधीत लावूनच ठेवाव्या लागतात.

- Advertisement -

इनविजीबल ब्रेसेस(अदृश्य ब्रेसेस)
इनविजीबल ब्रेसेस ह्या लिंगग्वल ब्रेसेस व क्लिअर ब्रेसेस अशा दोन प्रकारच्या असतात.

लिंगग्वल ब्रेसेस                                                                                                                  लिंगग्वल ब्रेसेस दातांच्या मागील बाजूने लावल्या जातात.त्यामुळे मेटल ब्रेसेस किंवा सिरॅमिक ब्रेसेस प्रमाणे त्या दातांवर पुढील बाजूने दिसत नाहीत. लिंगग्वल ब्रेसेसची किंमत इतर ब्रेसेसच्या तुलनेत खूप जास्त असते.

क्लिअर ब्रेसेस                                                                                                            क्लिअर ब्रेसेसला रमुवेबल ब्रेसेस असेही म्हणतात. क्लिअर ब्रेसेससाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जेवताना, ब्रश करताना त्या काढून पुन्हा लावता येतात. क्लिअर ब्रेसेस एखाद्या ट्रान्सपरंट प्लास्टिक आवरणाप्रमाणे दिसतात. ट्रिटमेंट सुरू असताना या ब्रेसेसचे अनेक सेट दिले जातात.दर दोन आठवड्यांनी ते बदलणे गरजेचे असते. हे ब्रेसेस सुद्धा महाग असतात.

लहान मुलांचे दात काढल्यानंतर घ्यावयाची काळजी
काय खावे आणि काय टाळावे
मेटल ब्रेसेस, सिरॅमिक ब्रेसेस, लिंगग्वल ब्रेसेस लावल्यानंतर चॉकलेटसारखे चिकट किंवा सुक्यामेव्याप्रमाणे कठिण पदार्थ खाणे टाळावे. कारण त्यामुळे ब्रेसेस दातातून निघू शकतात. या व्यतिरिक्त आपण कोणतेही पदार्थ खाऊ शकता. ब्रेसेस काढल्यानंतरही तुम्ही लगेच कोणतेही पदार्थ खाऊ शकता. ब्रेसेससाठी मुलांना खाण्यावर कोणतीही बंधने नसतात.

इतर बाबतीत घ्यावयाची काळजी
सामान्यत: तोंडातील स्वच्छता व ब्रेसेसची काळजी घ्यावी. प्रत्येकवेळी कोणताही खाद्यपदार्थ खाल्ल्यास दात घासावे. दिवसभरात दोन वेळा दात घासताना डॉक्टरांनी सांगितलेल्या ऑर्थोडाँटिक विशेष ब्रशचा वापर करावा. कायमस्वरुपी म्हणजेच मेटल ब्रेसेस किंवा सिरॅमिक ब्रेसेस वापरताना त्यांचा संबंध तोंडातील आजुबाजूची त्वचा, हिरड्यांसोबत येतो त्यामुळे स्वच्छतेसाठी वारंवार गुळण्या कराव्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -