घरलाईफस्टाईलवापरलेली चहा पावडर फेकून देण्यापूर्वी 'हे' वाचा

वापरलेली चहा पावडर फेकून देण्यापूर्वी ‘हे’ वाचा

Subscribe

चहाची पावडर फेकण्याऐवजी दुसऱ्यांदा कशी काय वापरता येईल. जाणून घ्या चहा पावडरीचा पुनर्वापर कसा करावा.

बऱ्याचदा चहाचे सेवन केल्यानंतर चहाची पावडर आपण फेकून देतो. मात्र, जी पावडर आपण फेकून देतो त्या चहाच्या पावडरचे अनेक फायदे आहेत हे आपण विसरुनच जातो. चला तर जाणून घेऊया, वापरलेल्या चहाच्या पावडरीचे अनेक फायदे.

सर्वप्रथम वापरलेली चहा पावडर स्वच्छ साफ करुन घ्यावी. साफ करताना अशा प्रकारे साफ करा की, त्यातून साखरेचा गोडवा संपूर्ण निघून जाईल.

- Advertisement -

कंडीशनर म्हणून करा वापर

वापरलेली चहा पावडर स्वच्छ धुऊन घ्या. त्या नंतर एका भांड्यात पाणी घेऊन ती चांगली उकळवा आणि त्या पाण्याचे नैसर्गिक कंडीशनर म्हणून वापर करा.

- Advertisement -

भांडी स्वच्छ करा

वापरेल्या चहा पावडरचा भांडी स्वच्छ करण्यासाठी वापर करु शकता. भांडी घासण्याच्या पावडरीमध्ये चहा पावडर एकत्र करा आणि त्यांनी भांडी घासा. भांडी चकाकण्यास मदत होईल.

झाडांसाठी खत

चहा गाळल्यानंतर ती चहा पावडर फेकून देऊ नका. ती गळलेली पावडर झाडांच्या रोपात घाला. यामुळे झाडांसाठी खत नैसर्गिक खत मिळेल. यामुळे झाडांचे आरोग्य सुधारते.

जखम लवकर बरी होते

चहापावडमध्ये अँटीऑक्सिडेंटचा समावेश असतो. त्यामुळे जखम झाल्यास चहापावडरीने जखम साफ करा, याने जखमा लवकर भरतात.

माशांपासून सुटका मिळवा

चहापावडरीचा उपयोग माश्यांपासून सुटका करण्यासाठीही होतो. जर घरात खूप माशा झाल्या असतील तर उरलेली चहापावडर एका बालदीत घालून पूर्ण घर स्वच्छ करा.

दातदुखीचा त्रास

दातदुखीचा त्रास होत असल्यास चहाची पावडर कोमट पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखी बरी होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -