घरलाईफस्टाईलमासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणार्‍या महिलांनो सावधान!!

मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणार्‍या महिलांनो सावधान!!

Subscribe

श्रावण महिन्यापासून सणांची रेलचेल सुरू होते. हळूहळू गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी आणि लग्नसराई असे एकामागोमाग एक अनेक सोहळे येतात. २१ व्या शतकातही स्त्रियांची मासिकपाळी ही विटाळ समजली जाते. त्याच्यासोबत वर्षांनुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपरा स्त्रीला अनेक धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवतात. पाळीच्या पाच दिवसांत स्वयंपाकघर, मंदिरे, इ.मध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात. मग मासिकपाळीचा अडथळा दूर सारण्यासाठी अनेकजणी बाजारात उपलब्ध असलेल्या औषध कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतात. पण असे करणे खरंच सुरक्षित आणि योग्य आहे का? त्याचा आरोग्यावर काही परिणाम होतो का? या बाबतची खास माहिती तुमच्यासाठी.

वैैद्यकिय संशोधनानुसार पी.सी.ओ.एस. (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) सध्या महिलांमध्ये आढळणारा सर्वांत चर्चित आजार आहे. जो अनियमित पाळी, सकष्ट पाळी, अत्यार्तव, कष्टार्तव, उदर-कटी शूळ, लठ्ठपणा, निद्रानाश अशी सर्व लक्षणे घेऊन येतो. त्याचे मुख्य कारण संप्रेरक (हार्मोनल) औषधांचा अतिवापर व अयोग्य वापर. दीर्घ काळाने व्यक्त होणारा स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर यांमध्ये संप्रेरकांचा वेळोवेळी वापर हे एक कारण सांगितलेले आहे.

- Advertisement -

नैसर्गिकरित्या प्रत्येक स्त्रीच्या शरीराचे एक विशिष्ट (संप्रेरक) हार्मोनल पॅटर्न ठरलेले असते. त्यानुसार प्रत्येकीची मासिक पाळी ठरते. आणि काही कारणांमुळे ती पुढे-मागे होऊ शकते. मुळातच स्त्रिया मासिकपाळी पुढे ढकलण्यासाठी ज्या औषधी घेतात त्या पाळी पुढे ढकलण्यासाठी नसून शरीरातील (संप्रेरक) हार्मोन्सचे संतुलन कमी करण्याचा एक वैद्यकीय पर्याय किंवा औषध आहे. त्यामुळे जेव्हा स्त्रिया या गोळ्या घेतात तेव्हा नकळतच त्या शरीरातील ठरलेले (संप्रेरक) हार्मोन्सचे चक्र बिघडवतात.

या गोळ्यांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

वेगवेगळ्या शरीर प्रकृतीनुसार महिलांमध्ये या औषधांचा वेगवेगळा परिणाम दिसू शकतो.शरीरातील उष्णता वाढणे,चक्कर येणे, डोकेदुखी, अंगावर पांढरे जाणे, पोटदुखी, मूड्समधील बदल,पित्ताचा त्रास होणे,मळमळणे, उलट्या होणे, चेहर्‍यावर मुरुमं-पुटकुळ्या वाढणे, पाळीमधील अनियमितता,रक्तस्त्राव कमी-जास्त होतो तर काही विशिष्ट दिवसांनंतर मध्येच रक्तास्राव होणे असे परिणाम होऊ शकतात.

- Advertisement -

त्यामुळे महिलांनो, कितीही काहीही झाले तरी पाळी लांबवण्यासाठी गोळ्या घेऊ नका, कारण शेवटी प्रश्न तुमच्या आरोग्याचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -