घरलाईफस्टाईलबॉसी महिला म्हणजे कणखऱ नेतृत्व

बॉसी महिला म्हणजे कणखऱ नेतृत्व

Subscribe

स्वभावाने शिस्तीप्रिय, खंबीर असलेल्या महिलेबदद्ल बोलताना बॉसी हा शब्द सरासपणे वापरला जातो. तर एखादा मुलगा दुसर्‍याला त्याचे मत स्वीकारण्यास भाग पाडण्याचा आग्रह धरतो, किंवा ते स्वीकारले जात नसेल तर आक्रस्ताळेपणा करतो त्याला दबंग व्यक्तीमत्व म्हटल जातं. एवढचं नाही तर त्याचा दबंग स्वभाव हा सक्षम लीडर असल्याचे संकेत असल्याचे म्हटले जाते. त्याच्यातील नेतृत्वगुणाची वाहवा केली जाते. पण जर एखाद्या महिलेचा असा दबंग स्वभाव असेल, तिच्यात उत्कृष्ट नेतृत्वगुण असतील, दुसऱ्याच्या ऑर्डर न घेता ती स्वता:च्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला ‘बॉसी’, ‘हट्टी’हेकेखोर’ असे म्हटले जाते.

- Advertisement -

 

याचे कारण म्हणजे खंबीरपणा, आक्रमकता, महत्त्वाकांक्षा ही विशेषण सामान्यत: पुरुषांशी संबंधित आहेत. आणि नेमके हेच गुण आपण नेत्यामध्ये पाहण्यास उत्सुक असतो. पण महिलेमध्ये हेच गुण दिसता ती अहंकारी वाटू लागते.तिला बॉसी म्हटल जात. बॉसी म्हणजे दुसऱ्यावर अधिकार गाजवणारी. प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी जर महिला बॉस असेल तर तिच्यासाठी‘बॉसी’ हा शब्द आवुर्जून वापरला जातो.

- Advertisement -

पण बॉसी हा शब्दाची सुरुवात 2014 मध्ये शेरिल सँडबर्ग यांनी “बॅन बॉसी” मोहीमेपासून केली. ज्याला महिलांबरोबरच पुरुषांनीही पाठिंबा दिला. या मोहिमेचा उद्देशच असा होता की मुलींना सक्षम स्त्री बनवणं.तेव्हापासून नेतृत्ववान महिलांसाठी बॉसी हा शब्द चलनात आला. आजही आपल्याकडे अशा कणखर महिलांसाठी बॉसी हा शब्द वापरला जातो. पण बॉसी असलेली महिलांचा समावेश जरी कतृत्ववान, सक्षम नेतृत्व असलेल्या स्त्रीसाठी होत असला तरी या स्त्रिया फक्त अधिकारच नाही गाजवत तर दुसरीला अधिकारही मिळवून देण्यात पुढे असतात. घर आणि ऑफिस या महिला सहज सांभाळू शकतात.

यामुळे कामाच्या ठिकाणीही या महिलांना हलगर्जीपणा चालत नाही.सहकाऱ्यांनी शिस्तीत काम करण्याचा यांचा आग्रह असतो. नेतृत्वगुण असल्यानेच या व्यक्तीमत्वाच्या महिला कंपन्यांमध्ये मोठया पदावर कार्यरत असल्याचे पाहायला मिळते. अनेक कंपन्या असे नेतृत्वगुण असलेल्या महिलांच्या शोधात असतात. कारण या महिला उपजतच असलेल्या स्त्रीसुलभ स्वभावामुळे कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून सहज सोडवू शकतात. त्याचा फायदा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे कंपनीला फायदा होतो. यामुळे जर तुमच्यातही असे बॉसी गुण असतील तर त्याचा योग्य वापर करा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -